child marriage : गोताणे गावात बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश

 child marriage :   धुळे तालुक्यातील गोताणे गावात 27 फेब्रुवारी 2024 रोजी बाल विवाह होणार असल्याची तक्रार  25 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा बाल संरक्षण कक्ष,धुळे यांना प्राप्त झाली होती. प्रशासनाने सतर्कता दाखवुन सदरचा बाल विवाह रोखला

 

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड लाईन प्रकल्प समन्वयक प्रतिक्षा मगर व सुपरवाईजर मुकेश महीरे, महेंद्र चव्हाण, तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय व्ही. डी.पाटील, पो.कॉ.तुषार देवरे व गोताणे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व्ही.आर.नवाळने, सरपंच जिजाबाई पाटील, पोलीस पाटील मधुकर पाटील यांच्या मदतीने घटनास्थळी जावुन बाल विवाह अधिनियम 2006 च्या कायद्याबाबत संबंधिताना कायदे विषयक माहिती देण्यात आली.

बाल विवाह केल्यास कायदेशिर कारवाईस आपण जबाबदार राहाल याची जाणीव करुन देण्यात आली. तसेच सदर बालविवाह थांबविण्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील कार्यान्वित यंत्रणेस यश आले

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, राजेंद्र बिरारी व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने जिल्हयात विविध ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातुन तसेच जिंगल्स व पथनाटयाच्या माध्यमातुन बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. तरी देखील बालविवाहाचा होत आहे पंरतू प्रशासनाने सतर्कता दाखवुन सदरचा बाल विवाह रोखला. यावेळी प्रशासनाचे कर्मचारी, चाईल्ड लाईन 1098 चे प्रकल्प समन्वयक श्रीमती, प्रतिक्षा मगर, सुपरवाईझर मुकेश महिरे, महेंद्र चव्हाण उपस्थित होते.