तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव, २३ एप्रिल: साडेआठ वर्षाच्या अथक परिश्रमाने चोपडा येथिल सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र भालेराव यांचा मुलगा भूषण भालेराव, वय २१ वर्षे याच्या अपघाती निधना नंतर नुकसान भरपाई म्हणून रक्कम ६५ लाख रू. विमा कंपनीने द्यावे असा आदेश न्यायालयाने दिला.
अपघातात मृत झालेला भूषण भालेराव, वय २१ हा भारतीय सैन्य दलात कॅप्टन होता. तो मित्र प्रो. नागेश रावसाहेब यांच्यासोबत पल्सर मोटवर सायकलने नागपूरहून खामगावकडे येत असतांना त्यांच्या मोटार सायकलला ट्रकने मागुन ठोस मारली. या अपघातात दोघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. अपघात करणारी ट्रक गुन्हा न नोंदविता घटनास्थळावरून पळून गेली. अपघात ४ जून २०११ रोजी अकोला येथे नॅशनल हायवे क्रं. ६ वर खदान पोलीस स्टेशनच्या हद्यीत स. ५:३० वाजेला घडला होता. या घटनेची फिर्याद अकोला येथिल खदान पोलीस स्टेशन येथे सरकारतर्फे पोलीस अधिकारी प्रकाश शिरसाठ यांनी नोंदविली. या सुनावणी दरम्यान कोरोना महामारी कालवधी तर विमा कंपनीने पोलीस तपासणी अधिकारी यांची साक्ष नोंदविण्यासाठी ३ वर्षे, औरंगाबाद येथिल आर.टी.ओ यांची साक्ष नोंदविण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी घालविला.
अखेर मयताच्या कुटूंबास रक्कम रू.६५ लाख एवढी नुकसान भरपाई देण्याचा आदेश तसेच या रकमेवर ६ टक्के व्याज अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून म्हणजेच २ जूलै २०१४ ते विमा कंपनी नुकसान रक्कम जमा करेपर्यंतच्या कालावधी म्हणजेच साधारण ९ वर्षाचे व्याज देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधिश क्रं.१ एस. एस.सपातनेकर यांनी नुकताच खुल्या कोर्टात निकाल जाहीर केला. अर्जदारातर्फे ऍड महेंद्र चौधरी, ऍड हेमंत जाधव, ऍड. श्रेयस महेंद्र चौधरी यांनी काम
पाहिले.