तरुण भारत लाईव्ह । २२ मे २०२३। उन्हाळ्याचा दिवसांत नेहमी ताजे दह्याचेच ताक घेतलेले अत्यंत उत्तम. ग्रीष्म ऋतूमध्ये दही पूर्णपणे वर्ज्य सांगितलेले असते. दह्याने बनवले जाणार मसाला ताक जे उन्हाळ्यात प्रत्येकाने घेतलेच पाहिजे. मसाला ताक हे घरी बनवायला खूप सोप्प आहे. मसाला ताक घरी कसं बनवलं जात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
२ वाटी लोणी काढलेले ताजे पातळ ताक, २ टी स्पून तूप, अर्धा टी स्पून जिरे, १/४ टी स्पून किसलेले आले, २-३ कढीपत्त्याची पाने, थोडे हिंग, चवीपुरते मीठ, बारिक चिरलेली कोथिंबीर.
कृती
सर्वप्रथम कढई मध्ये २ टी स्पून तूप गरम करावे त्यावर जिरे घालावे, जिरे तडतडले की त्यामध्ये हिंग, किसलेले आले, कढीपत्त्याची पाने आणि आवडत असल्यास अगदी छोटासा हिरव्या मिरचीचा तुकडा घालावा. ही फोडणी लगेचच ताकावर घालावी, त्यामध्ये काळे मीठ घालून व्यवस्थित ढवळून त्यात कोथिंबीर टाकून प्यायला घ्यावे. हे असे तुपाची फोडणी देऊन केलेले ताक जवळ-जवळ सगळ्याच प्रकृतींना मानवते. असे ताक जेवणानंतरही घेतले तर चालते, पण कधीतरी बिल्कूलच भूक नसेल तर अशाप्रकारचे मसाला ताक जेवणाऐवजीपण घेतले तर चालते.