तरुण भारत लाईव्ह । २५ जानेवारी २०२३। लोणचे म्हटले कि आपल्या तोंडाला पाणी सुटते. कैरीचं लोणचं, लिंबाच लोणचं असे अनेक प्रकार लोणच्यांमध्ये पहायला मिळतात पण तुम्ही कधी मिरचीचे लोणचे ट्राय केले आहे का? तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मिरची आधीच एवढी तिखट असते तर मिरचीचे लोणचे किती तिखट असेल? पण काळजी करू नका. मिरचीचे लोणचे हे चवीला आंबट लागते. हे मिरचीचे लोणचे तुम्ही दशमी सोबत आणि पराठयांसोबत खाऊ शकतात. हे लोणचे कसे बनवतात हे जाणून घ्या तरुण भारत च्या माध्यमातून.
साहित्य
2 किलो हिरवी मिरची, 1 वाटी मोहरीची डाळ, १ चमचा मेथीची पूड, 3/4 चमचा हळद, 1 चमचा हिंग, दीड ते दोन वाट्या मीठ, 6 लिंबाचा (रस), 1/2 वाटी तेल.
कृती
सर्वप्रथम एका ताटात किंवा परातीत मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. कढईत तेल कडकडीत तापवावे. तेल तापले की ते परातीतल्या पदार्थांवर ओतावे व झार्याने ढवळावे. मिरच्या धुऊन फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. नंतर त्याचे तुकडे करावे. त्यात 2 चमचे बाकी ठेवून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच डाळीचा मसाला घालावा. बरणीत 2 चमचे मीठ घालावे. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून एक चमचे मीठ घालावे. दुसर्या किंवा तिसर्या दिवशी 6 लिंबाचा रस काढून लोणच्यात घालावा.