चिनावल दगडफेक प्रकरण; ३०७ कलम वाढवण्याची मागणी

जळगाव : चिनावल येथे झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणात येथील शेख आदिल शेख शकील यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना मारहाण करणारे सुमारे आठ ते दहा जण असताना केवळ तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी तपास करून आरोपींच्या संख्येत वाढ करावी, तसेच ३०७ कलम वाढवावे, अशी मागणी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्याकडे एका शिष्टमंडळाने केली आहे.

शिष्टमंडळाने म्हटले आहे की, चिनावल येथे झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणात येथील शेख आदिल शेख शकील यांना गंभीर दुखापत झाली.  त्यांची २१ मे रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या ‘जबडा फॅक्चर’ असल्याने त्या ठिकाणी प्लेट लावण्यात आलेली आहे.

गंभीर जखमी रुग्णाचे १८ मे रोजी जिल्हा पेठ पोलिसांनी जबाब नोंदवून ती कागदपत्रे सावदा पो स्टे येथे पाठवली होती त्या नुसार सावदा पोलिसांनी २१ मे रोजी एफ आय आर क्रमांक ९३/२२ भादवी ३९२,३२४,३२३,५०४ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.

वास्तविक पाहता सदरचा रुग्ण हा गंभीर जखमी झालेला असून त्याची शस्त्रक्रिया सुद्धा झालेली आहे. असे असताना  भादवी ३०७ चा समावेश करण्यात आलेला नसल्याने ते वाढीव कलम लावण्यात यावे. जखमी रुग्णाला मारहाण करणारे सुमारे आठ ते दहा व्यक्ती होते. त्यापैकी तीन व्यक्तींना त्याने नावानिशी ओळखले होते तरी गुन्हा दाखल करताना फक्त तीनच आरोपीची नावे नोदवली आहे. त्यात पोलिसांनी तपास करून आरोपींच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्याकडे एका शिष्टमंडळाने केली आहे.

शिष्ट मंडळात यांचा समावेश
फारूक शेख अब्दुला, अध्यक्ष, जलगांव जिल्हा मनियार बिरादरी, सैय्यद चांद अमीर, अध्यक्ष, कुल जमाती, मतीन पटेल, अध्यक्ष, इमदाद फाउंडेशन, जलगांव, मजहर पठाण, अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट, अनीस शाह अय्युब शाह, सामाजिक कार्यकर्ता जलगांव, अनवर खान, अध्यक्ष, सिकलगर फाउंडेशन, जलगांव,दानिएल शेख, अध्यक्ष, ऍजल फुड, हाफ़ीज़ रहीम पटेल, अध्यक्ष, हुंफ़्फाज़ फाउंडेशन, कासिम उमर रफीक अहमद,राष्ट्रवादी पार्टी अजित पवार गट, सनिर सैय्यद, एम आय एम उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, सलीम एच इनामदार काँग्रेस आय, युसुफ खान, प्रहार संघटना, जळगाव,ॲड अल्त्मश शेख, रावेर, ॲड शेख अलीम त्यांचा समावेश आहे.