तरुण भारत लाईव्ह ।०३ फेब्रुवारी २०२३। वीकएंड सुरु होत आहे, या वीकएंड ला जर तुम्ही जर तुम्ही नवीन रेसिपी ट्राय करण्याचा विचार करत असाल तर चना चाट हा पदार्थ तुम्ही या वीकएंड ला ट्राय करू शकता. चटपटीत असा चना चाट हा सगळ्यांनाच आवडेल.हा पदार्थ घरी बनवायला सुद्धा सोप्पा आहे हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
हरभरे, कांदा, कैरी, टोमॅटो,चाट मसाला, मीठ, तिखट, जिरे पूड, कोथिंबीर, चिंच
कृती
सर्वप्रथम हरभरे काही तास भिजवून ठेवा. नंतर ते मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवा. हरभरे उकळल्यानंतर ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. हरभरे उकळल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या. त्यासाठी चाळणीच्या मदतीने ते गाळून घ्या. आता एका बाऊल मध्ये कांदा, टोमॅटो, कैरी कापून घ्या. आता यात लिंबाचा रस, मीठ, हिरवी मिरची, जिरे पूड, तिखट, चिंचेचा गर आणि चाट मसाला टाकून चांगले मिक्स करून घ्या. नंतर हरभरे टाकून चांगले मिक्स करून घ्या. आणि सर्व्ह करा चना चाट