सिनेस्टाइल दुचाकी लावली रस्त्यावर, तरुणीचा विनयभंग, पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव : राज्यात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहे. जळगाव जिल्ह्यात पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. एका शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या २९ वर्षीय तरुणीवर तीन वर्षांपासून एकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, सरकारी कार्यालयात कार्यरत 29 वर्षीय तरुणी शनिवारी दुपारी दिड वाजता कामानिमित्त दुचाकीने जात असताना पारोळा-विचखेडे दरम्यान संशयित समाधान लोटन चौधरी (35, पारोळा) याने त्याची दुचाकी आडवी लावत रस्ता अडवला तसेच तरुणीचा विनयभंग करत धमकी दिली.

या प्रकरणी पीडीत तरुणीने पोलिसात धाव घेतली तसेच यापूर्वी अनेकदा संशयिताने अत्याचार केल्याचा आरोप करीत विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर संशयित समाधान चौधरी विरोधात विविध कलमान्वये पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.