---Advertisement---
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगरला वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हाती घेतले असून त्या मीटरमुळे वीज ग्राहकांना जास्तीचे वीज बिल येत आहे. तर कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करीत असल्याच्या विरोधत कनिष्ठ अभियंता व कर्मचाऱ्याची बदली करा, या मागणीचे निवेदन देत अभियंत्याच्या दालनात ठिय्या मांडला होता.
यावेळी निलेश ठाकुर, मिलींद मेंढे, उमेश झांबरे, निलेश सुरळकर, सजविनी वाघ, पायल कोळी, आशा कोळी, प्रकाश माळी, शारदा कोळी, अमिता धनगर, लता माळी, संगीता माळी, निर्मला माळी, तुळशाबाई चौधरी, कमलाबाई बारी, सुनिल वाघ, शबाना पिंजारी, रुपाली इंगळे, मिलींद बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येने सिध्देश्वर नगरमधील नागरिक या आंदोलनात सहभागी होते.
नवीन मीटर काढा जुनेच मीटर लावा
गेल्या पस्तीस वर्षापासून – वसलेल्या सिध्देश्वर नगरला ग्रामीण – भागाच्या सात गावाच्या फिडरवरून – वीजपुरवठा केला जातो. यापैकी – एखाद्या गावात विजेचा बिघाड झाला तर सिध्देश्वर नगरचा वीजपुरवठा खंडित केला जातो. त्याबाबत विराव
एखाद्या वीज ग्राहकांना याची माहिती घेण्यासाठी विचारणा केली तर वीज कर्मचारी काहीतरी थातूर मातुर उत्तर देऊन मोकळे होतात. तर अभियंत्यांना विचारणा केली की, थेट गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात. अशा बेजबाबदारपणे वागण्याऱ्या वीज कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करा व लावलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांना वाजवीपेक्षा जास्त वीज बिल येत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा संताप व्यक्त करीत सिध्देश्वर नगरमधील रहिवाशांनी कार्यकारी अभियंता पंचबुद्धे यांच्या दालनात ठिय्या मांडला.