जळगाव : जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पारोळा तालुक्यात असलेल्या सब गव्हाण टोल नाक्यावर घडली. या हाणामारीत दोन्ही गटातील आठ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यात असलेल्या सब गव्हाण टोल नाक्यावर एक दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याच वादातून दोन गटांत पुन्हा तुफान हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात एकमेकांवर दगडांनी आणि लाथा-बुक्क्यांनी हल्ला करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
काहीजण रस्त्यावर पडून असताना त्यांच्यावरही बेधडक मारहाण सुरू असल्याचे दिसत आहेत. या हाणामारीत दोन्ही गटातील आठ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी नशिराबाद टोळीतील दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बोदर्डे येथील झोपडी खाक
अमळनेर : बोदर्डे परिसरात दि. २६ रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास बोदर्डे गावातील झोपडीला अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत काशीनाथ दिलभर भिल यांची झोपडी संपूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत त्यांच्या संसारोपयोगी वस्तू, धान्य, कपडे, पैसे, दूरदर्शन संच तसेच महत्त्वाची कागदपत्रेही जळून गेले. संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याने कुटुंब उपासमारीच्या संकटात सापडले आहे. काशिनाथ भिल हे अत्यंत गरीब परिस्थितीत कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र, या आगीने त्यांच्यावर काळाने घाला घातला असून सध्या त्यांच्याकडे निवाऱ्यासाठीही काहीच उरलेले नाही.