---Advertisement---

Pachora News : बाजार समितीत स्वच्छता मोहीम

---Advertisement---

पाचोरा : येथील बाजार समितीच्या मुख्य यार्डात रविवार, २३ रोजी सकाळी १०.०० वाजता स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी आमदार किशोर पाटील, सभापती गणेश भिमराव पाटील, उपसभापती प्रकाश अमृत पाटील, संचालक प्रकाश शिवराम तांबे, मनोज प्रेमचंद सिसोदीय, युसुफ भिकन पटेल, सुनिल युवराज पाटील, लखीचंद प्रकाश पाटील, राहुल रंगराव पाटील, राहुल रामराव पाटील, विजय कडू पाटील, बाजार समितीतील व्यापारी सुभाष जगन्नाथ पटवारी, संजय छगनलाल सिसोदिया, राजेश पटवारी, नंदू पाटील, पारस जैन उपस्थित होते.

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील १०० दिवसांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत. पणन संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या १९ मार्च रोजीच्या परिपत्रकानुसार बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दररोज शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार होता असतात. असे व्यवहार होत असताना बाजार समितीच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात घनकचरा, पाला, पाचोळा, निर्माल्य संचित होत असतो. बाजार आवारामध्ये शेतमाल खरेदी विक्रीसाठी दररोज हजारो शेतकरी, हमाल तोलारी, आडते, व्यापारी व इतर अनुषंगिक घटकांची मोठ्या प्रमाणात ये जा होत असते. बाजार समितीच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याने या सर्व घटकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असतो. राज्यातील सर्व बाजार समित्यांचे आवार स्वच्छ करण्याची मोहीम पुढील १०० दिवसात राबविण्याचे पणन विभागाने निश्चित केले आहे.

सदरचे अभियान राबविण्यासाठी बाजार समितीतील सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, आडते, व्यापारी, हमाल तोलारी व संबंधित घटक यांचा सहभाग अभियानात असावा असा पणन संचालक यांच्या सूचना आहेत. या पार्श्वभूमीवर पाचोरा येथील बाजार समितीच्या मुख्य यार्डात रविवार, २३ रोजी सकाळी १०.०० वाजता स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी आमदार किशोर पाटील यांनी याबाबतच्या सूचना बाजार समिती प्रशासनास दिल्या. सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाने आभार व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment