मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस ; शेती, गुरांसह घरांचे मोठे नुकसान

---Advertisement---

 

मुक्ताईनगर : तालुक्यातील कुऱ्हा, काकोडा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने शेती, गुरे व घरांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तर काकोडा येथील युवक पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तालुक्यातील जोंधणखेडा धरणाचे दरवाजे बऱ्याच कालावधीनंतर पूर्णपणे उघडले गेल्यामुळे सर्व परिसरात पाणीच पाणी झालेले आहे. 2006 नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून त्या वेळच्या महापुराची आठवण नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.तालुक्यातील पारंबी,कुऱ्हा, वडोदा, हिवरा, राजुरा, जुने व नवे बोरखेडा, मोरखेडा, चिंचखेडा खुर्द, जुनी खोरी काकोडा या सर्वच परिसरामध्ये अतिशय जोरदार अशी अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरलेले आहे. मोरझीरा व कुऱ्हा परिसरातील शेतातील केळी पिके वाहून गेलेले आहे. काही शेतकऱ्यांची कापूस, तूर यासारखी पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत.

कुऱ्हा गावामध्ये गोरक्षण गंगा नदीचे पाणी पूर्णपणे गावात शिरलेले असून काठावरील दोन्ही बाजूच्या दुकानांना व घरांना पूर्णपणे झळ पोहचलेली आहे. विशेष म्हणजे गोरक्षण गंगा नदीच्या काठावरच संपूर्ण मार्केट वसलेले असल्याने पूर्ण मार्केटमध्ये पाणीच पाणी पसरले हे असून मार्केट मधील अनेक व्यापाऱ्यांची दुकाने पुरात वाहून गेली आहेत. शेती,घरे व गुरे देखील पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अतिशय प्रचंड वेगाने पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नदीला पूर आला, परवा रात्रीपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती मात्र पाहता पाहता सकाळी आठ वाजेपासूनच अतिवृष्टीला सुरुवात झाली पावसाने उग्ररूप धारण केले व ढगफुटी सदृश्य असा पाऊस या परिसरात पडला.

जोंधनखेडा धरणाच्या व पाणलोट क्षेत्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला यामध्ये शेती पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसून आले, काकोडा येथील जुनी खोरी जवळील धरणावरून सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात वाहण्यास सुरुवात झाल्याचे दिसून आले.मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी तातडीने कुऱ्हा परिसरात भेट दिली. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे व नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी नागरिकांनी यावेळी तहसीलदार यांना केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---