येतोय कोका-कोला स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स!

तरुण भारत लाईव्ह । २७ जानेवारी २०२३ । कोका- कोला या कंपनीच नाव तुम्ही ऐकलंच असेल. पण या कंपनीचं पेय म्हणून हे प्रचलित आहे. कोका-कोला आता लवकरच स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोन च्या डिझाईनचा फोटो सुद्धा वायरल झाला आहे. आता हा स्मार्टफोन बाजारात कधी दाखल होतो आणि याचे फीचर्स कसे असतील हे जाणून घ्या तरुण भारत’च्या माध्यमातून.

यामध्ये ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. हा फोन अँड्रॉयड १३ आधारित Realme UI कस्टम स्किन आउट ऑफ द बॉक्स वर रन करतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा दिला आहे. फ्रंट वर १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये पॉवर बॅकअप देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी आणि 33W SuperVOOC fast charging सपोर्ट दिला आहे.

कोका- कोला स्मार्टफोन ची माहिती टिपस्टर मुकुल शर्मा यांनी दिली असून, हा स्मार्टफोन यावर्षी मार्च महिन्याआधी भारतीय बाजारात उपलब्ध होईल. या फोन द्वारे कोका कोला स्मार्टफोन ब्रँड रियलमी सोबत पार्टनरशीप करण्याची शक्यता आहे. हा फोन Realme 10 4G फोनचा रिब्रँडेड व्हर्जन म्हणून समोर येवू शकतो. फोटोत फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सुद्धा दिसत आहे.