कोकोनट बिस्कीट ट्राय केलायं का?

तरुण भारत लाईव्ह ।०६ मार्च २०२३। चहा सोबत बिस्किट्स खाणं हे जवळपास प्रत्येकाला आवडतं. पार्ले, मॅरीगोल्ड, क्रॅक जॅक, यासारखे बिस्किट्स आपण खातच असतो. पण तुम्ही कधी कोकोनट बिस्किट्स ट्राय केल आहे का? तसेच घरी कधी ट्राय केलं आहे का? तुम्ही जर ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा. चला तर जाणून घेऊया कोकोनट बिस्किट्स घरी कसे बनवतात.

साहित्य
मैदा, लोणी, पिठीसाखर, व्हॅनिला इसेंस, खाण्याचा सोडा, सुक्या खोबऱ्याचा कीस, दूध

कृती
सर्वप्रथम तूप व साखर एकत्र करुन फेसावं. नंतर त्यात मैदा, व्हॅनिला, खोबऱ्याचा कीस मिसळावं. किंचित सोडा घालावा. आवश्यक तेवढ दूध घालून पुरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवावं. त्याची जाड पोळी लाटून गोल बिस्किट कापावीत. खोबऱ्याच्या किसात एका बाजूने बुडवून ट्रेमध्ये लावून गरम ओव्हनमध्ये भाजावीत. तयार आहेत कोकोनट बिस्किट्स.