---Advertisement---

Pachora News : एसएसएमएम महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान

---Advertisement---

पाचोरा : स्पर्धा परीक्षेद्वारे अधिकारी होणे हे अनेकांचे स्वप्न असते. या परीक्षेसाठी शिस्तबद्ध, नियोजनबद्ध अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत निश्चित यश मिळू शकते, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी केले.

पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित तयारी स्पर्धा परीक्षांची या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,स्पर्धा परीक्षांची ओळख ,तयारी व आव्हाने या विषयावर प्रा. राजेंद्र चिंचोले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

महाविद्यालयाच्या आयसीटी सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ हे होते .मार्गदर्शक म्हणून प्रा.राजेंद्र चिंचोले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही.टी जोशी, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष प्रा. सी एन चौधरी, सतीश चौधरी, माजी प्राचार्य डॉ. बी एन. पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पाटील उपप्राचार्य डॉ.वासुदेव वले हे होते.

राजेंद्र चिंचोले यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व परीश्रमपूर्ण अभ्यास करण्याचे आवाहन केले .स्पर्धा परीक्षेत प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी झालेल्या यशस्वी व्यक्तींची त्यांनी अनेक उदाहरणे दिली.आपली आर्थिक परिस्थिती, शारीरिक अपंगत्व आपल्या यशाच्या आड येणार नाही असेही त्यांनी सांगितले. केंद्रीय व राज्यस्तरावरील विविध स्पर्धा परीक्षा स्वरूप समजून सांगितले .शैक्षणिक बुद्धिमत्ता प्रत्येकाकडे असते. आपली बुद्धिमत्ता ओळखून व्यावसायिक व कौशल्यपूर्ण बुद्धिमत्तेचा वापर करून प्रत्येकाने जीवनात यशस्वी व्हावे अशा प्रकारचे मार्गदर्शन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संजय वाघ म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःतील क्षमता ओळखून स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. करिअरच्या अनेक संधी असून त्या आपल्याला शोधता आल्या पाहिजे. आपल्याकडील ज्ञान समाजाला कसे उपयोगी होईल व समाजाच्या तळागाळातील विद्यार्थी हा राष्ट्र हिताच्या दृष्टीने देश सेवेसाठी सहभागी झाला पाहिजे . यासाठी संस्था व महाविद्यालय परिवार विद्यार्थ्यांच्या नेहमी पाठीशी असून कुठलेही अडचण विद्यार्थ्याला येणार नाही. .
प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष प्रा. सी.एन चौधरी यांनी केले . सूत्रसंचालन डॉ. जे. डी. गोपाळ यांनी केले तर आभार अँड. महेश पवार यांनी मानले कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---