भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव यांचे वडील टिळक यादव यांचे बुधवारी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. उमेशचे वडील गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताणा निधन झाले.
यादव यांचे वडील टिळक यादव हे वलनी कोळसा खाणीत निवृत्त कर्मचारी होते. उत्तर प्रदेशातील पडरौना जिल्ह्यातील पोखरभिंडा गावातून टिळक यादव नोकरीच्या शोधात नागपुरात आले होते. वेस्टर्न कोलफिल्डमध्ये काम करणारे टिळक यादव हे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
टिळकांना तीन मुले, दोन मुली आणि एक मुलगा उमेश यादव. कोळसा खाणीत नोकरी मिळाल्यानंतर ते नागपूरजवळील खापरखेडी येथे आले आणि तेथे राहू लागले.
टिळक यादव यांना उमेशने पोलीस दलात भरती व्हावे असे वाटत होते. वडिलांच्या इच्छेनुसार उमेश यादवने लष्कर आणि पोलिसात भरती होण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. टेनिस बॉलने क्रिकेट खेळणाऱ्या उमेशला रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यानंतर त्याने भारतीय संघातही पदार्पण केले. विदर्भाकडून कसोटी खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला.