अखेर ! केंद्रप्रमुख पदासाठी 2384 जागांसाठी विभागीय परीक्षेचे आयोजन; वाचा सविस्तर

तरुण भारत लाईव्ह न्यूज : अखेर राज्यातील केंद्रप्रमुख भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, राज्यात 2 हजार 384 जागांची मोठी भरती निघाली आहे, जून 2023 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 6 जून 2023 ते दिनांक 15 जून 2023 या कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात आले आहे, सविस्तर जाहिरात पाहूया…

राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३’ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात आयोजन करण्यात येणार आहे.

राज्यात 2384 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

राज्यामध्ये केंद्रप्रमुख पदासाठी 2384 जागांची मेगा भरतीची जाहिरात निघाली असून, पात्र उमेदवारांकडून दिनांक 6 जून 2023 ते दिनांक 15 जून 2023 या कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात आले आहे. तर जून 2023 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

वेतनश्रेणी

केंद्रप्रमुख पदासाठी पुढीलप्रमाणे वेतनश्रेणी असणार आहे.
वेतनश्रेणी – S15 : 41800-132300

आवश्यक पात्रता अटी व शर्ती

जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
किंवा
प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून 3 वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील..
विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी पात्र राहतील.

टीप

सदरची भरती फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

लेखी परीक्षा स्वरूप योजना

परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल.
परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही.
सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील व त्यासाठी 2 तासाचा कालावधी राहील.
परीक्षेचे टप्पे – एक लेखी परीक्षा
परीक्षेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
प्रश्नपत्रिका – एक
एकूण गुण – 200

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.
जाहिरातीमध्ये नमूद अहर्ता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणान्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल.

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक – https://ibpsonline.ibps.in/mscepapr23
ऑनलाईन अर्ज – दिनांक 6 जून 2023 ते दिनांक 15 जून 2023
ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक – दिनांक 15 जून 2023
ऑनलाईन परीक्षा दिनांक – माहे जून २०२३ शेवटचा आठवडा (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो) केंद्रप्रमुख अधिकृत जाहिरात येथे पहा.