मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत गोंधळ, जरांगे स्टेजवर असताना तरुणाचा राडा

पुणे : मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये सभा झाली. जरांगेंचं भाषण संपत असातना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा माईक खेचून आपल्यला बोलू देण्याची मागणी केली. बोलू न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा त्याने दिला. यामुळे स्टेजवर काही काळ गोंधळाचं वातावर निर्माण झालं होतं.

आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. मराठ्यांना सरसरकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. हे शांततेचं युद्धच मराठ्यांना न्याय देणार आहे….. मराठा आरक्षणासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकारची धावपळ सुरू असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. मी एकदा शब्द दिला की कार्यक्रम झालाच म्हणून समजा, असा खणखणीत इशारा जरांगेंनी दिलाय. मनोज जरांगेंची पुण्यातल्या राजगुरूनगरमध्ये सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी होती. जरांगे सभेला पोहोचेपर्यंत ठिकठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलं उधळण्यात आली.

मनोज जरांगे म्हणाले, मला मराठा समाजाच्या वेदना सहन होत नाही. मी हार, तुरे स्विकारण्यासाठी नाही तर मराठ्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गावागावात फिरत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. आत्महत्यांना सरकार जबाबादार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर आत्महत्या झाल्या नसत्या. मराठ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. हे शांतता युद्ध आहे. ठोकल्याशिवाय आंदोलन मिळत नाही, अशी एकेकाळी मराठा समाजाची भावना होती, पण आता शांततेच आरक्षण मिळवणार असा शब्द आहे. मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय समाज एक इंचही मागे जाणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले, मी मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही. मराठा समाज माझा मायबाप आहे. मायबापाच्या शब्दापुढे नाही. आपल्या वाट्याला कष्ट आले परंतु लेकरांच्या वाट्याला हे नको. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्यातला मराठा एक झाला आहे. मराठा आरक्षण समाजाने समजून घेण गरजेचं आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की पुरावे लागतात. टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारने वेळ एक महिन्यांचा वेळ मागितला. सरकारला आपण चाळीस दिवसांचा वेळ दिला. आपण मुदत दिल्यानंतर हालचालीनंतर वेग आला आहे.

मी मराठ्यांशी गद्दारी करायची नाही. मी मरेपर्यंत मराठा समाजांशी गद्दरी करणार नाही. माझ्या जातीला न्याय देण्यासाठी मी उभा आहे. 24 तारखेपर्यंत काही बोलणार नाही. 22 ऑक्टोबरला पुढची दिशा ठरणार आहे. उद्रेक करायचा नाही. उद्रेक केला तर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे आपण शांततेने आंदोलन करायचे आहे. उग्र आंदोलन करायचे नाही.