Talathi Bharti 2023 Exam : सर्व्हर डाऊनमुळे तलाठी भरती परीक्षेत गोंधळ

पुणे : महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या ४६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी तब्बल १० लाख ४१ हजार इच्छूकांनी या पररीक्षेसाठी अर्ज भरले आहेत. तसेच या परीक्षेच्या फी वरून देखील काही दिवसांपूर्वी मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता या परीक्षेत गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात परीक्षेआधीच सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, काही ठिकाणी तलाठी पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे.

तलाठी भरतीसाठी आयोजीत करण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी भरतीची परीक्षा आज (२१ ऑगस्ट) पार पडत आहे. मात्र राज्यातील संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात परीक्षेआधीच सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर तलाठी पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातीस बाभूळगाव आणि कापशी येथील परीक्षा केंद्रांवर अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी बंद पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ होऊन देखील परीक्षा केंद्राबाहेरच थांबवे लागत आहे. नागपूरमध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे. नागपूर येथील बीएमव्ही महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर देखील विद्यार्थांना वर्ग खोल्यात प्रवेश मिळत नसल्याची तक्रार समोर आली आहे. दरम्यान, पुण्यातील तलाठी परिक्षेच्या सेंटर्सवर वेळ बदलाचे बोर्ड लावले आहेत. तलाठी पेपरची वेळ बदलण्यात आली आहे. आज दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत होणाऱ्या पेपरची वेळ बदलण्यात आली आहे. हा पेपर आता 2 ते 4 या वेळेत होणार होणार आहे.