तरुण भारत लाईव्ह । मोरेश्वर बडगे।
विधान परिषद निवडणुकांचा एरवी फारसा गाजावाजा होत नसतो. Satyajeet Tambe अनेकदा तर त्या झाल्या हे निकालानंतरच कळते. या निवडणुकीतील मतदार निवडक क्षेत्रातील असतात. पदवीधर मतदारसंघात पदवीधर मतदार असतात. शिक्षक मतदारसंघात शिक्षक मतदार असतात. Satyajeet Tambe मतदार होण्यासाठी नाव नोंदवावे लागते. ज्याला लढायची इच्छा असते, ती व्यक्ती किंवा संघटना मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेते. Satyajeet Tambe राजकीय पक्ष असल्या निवडणुकांमध्ये क्वचितच रस घेत आले आहेत. इथले आमदारही फारसे प्रकाशझोतात नसतात. मात्र या वेळच्या निवडणुका काही वेगळ्या आहेत. नाट्यमय घडामोडी होत आहेत, नवनवे ट्विस्ट येत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने तर संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघते आहे. इथे काँग्रेसचा उमेदवार नाही, भाजपाचाही नाही. Satyajeet Tambe अपक्ष लढताहेत. Satyajeet Tambeपित्याला म्हणजे डॉ. सुधीर तांबे यांना निलंबित करून काँग्रेसने त्यांच्या मुलाची निवडणूक सोपी केली, अशी चर्चा आहे.
Satyajeet Tambe नाशिकची जागा महाआघाडीतील काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. गेल्या तीन निवडणुका जिंकत आलेल्या डॉ. सुधीर तांबे यांना यावेळीही उमेदवारी दिली, एबी फॉर्मही पाठवला. उमेदवारी अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे सत्यजित तांबे यांना अपक्ष म्हणून अर्ज भरायला लावला आणि एकच खळबळ उडाली. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, आम्हाला फसवले. मात्र काहीतरी शिजतंय् असे मी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना फोन करून सांगितले होते असे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचे म्हणणे आहे. Satyajeet Tambe मग थोरात गप्प का राहिले? इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. १९८५ ची गोष्ट आहे. तेव्हाचे मोठे प्रस्थ भाऊसाहेब थोरात यांना संगमनेरचे विधानसभेचे तिकीट हवे होते. पण मिळाले नाही. तेव्हा त्यांच्या मुलाने बंड केले, अपक्ष म्हणून निवडूनही आला. तेव्हाच नव्हे, तर पुढे सलग ९ निवडणुकांमध्ये निवडून येतो आहे. तो मुलगा म्हणजे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात. Satyajeet Tambe सत्यजित तांबे हा त्यांचा भाचा! भाच्याने बंड केले असताना मामा मात्र थंड आहे. मौन आहे. काय राजकारण आहे?
महाआघाडी भक्कम आहे, अशा गप्पा आघाडीचे नेते नेहमी मारतात. Satyajeet Tambe मात्र त्यांच्यातील प्रचंड विसंवाद, असमन्वय या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. अजिबात ताळमेळ नाही. उमेदवारी अर्ज मागे घ्यायची मुदत केव्हाच संपली. महाआघाडीचा घोळ सुरूच आहे. Satyajeet Tambe नाशिकमध्ये शुभांगी पाटील नावाची एक लढाऊ महिला कार्यकर्ती आयती उद्धव ठाकरे यांच्या हाताशी लागली. नागपूर शिक्षक मतदारसंघात तर पटोले यांच्या घोषणेची वाट न पाहता माजी मंत्री सुनील केदार यांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराची घोषणाही करून टाकली. ही निवडणूक अचानक आली नाही. नियोजन करता आले असते. सत्यजित तांबे हे गेली २२ वर्षे काँग्रेसचे काम करताहेत, युवक काँग्रेसचे प्रदेशचे अध्यक्षही होते. Satyajeet Tambe काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला देवेंद्र फडणवीस पाहुणे होते. चांगल्या तरुणांना किती दिवस बाहेर ठेवणार? आमचं लक्ष जाते, या एका वाक्यात फडणवीस यांनी आजच्या वादळाची कल्पना दिली होती. Satyajeet Tambe दरबारी राजकारण करणा-या काँग्रेसवाल्यांना देवेंद्र यांचा इशारा कसा कळणार?
त्यांनी केवळ डॉ. सुधीर तांबे यांना सस्पेंड केले नाही, तर त्यांना मानणा-या तमाम मतदारांना गमावले आहे. Satyajeet Tambe भाजपा घर फोडण्याचे काम करतो अशा शब्दात पटोले आरडाओरडा करीत आहेत. पण काँग्रेसला त्यांची चांगली माणसे सांभाळता येत नसतील तर हेच होणार. आज तांबे गेले, उद्या सोने, पितळ… सारे जाणार! देवेंद्र फडणवीस यांच्यातील नेतृत्वगुणाला सलाम केला पाहिजे. Satyajeet Tambe फडणवीस अशी काही खेळी खेळतात की, विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होतो. त्यांना मंत्रालयातील फाईल कळते, सचिन वाझे कळतो आणि कार्यकत्र्यातीलं सोनंही कळतं. त्यांनी मेहनती, अभ्यासू, जिगरबाज तगडी टीम बांधली आहे. Satyajeet Tambe काँग्रेसमध्ये चांगल्या कार्यकत्र्याला पुढेच येऊ देत नाहीत. पाय ओढणे सुरू होते. त्यामुळे काँग्रेसला वाईट दिवस आले आहेत. यात्रेत जोडो आणि यात्रा गावातून गेली की तोडो, असा हा फंडा आहे. गांधी-नेहरूंची काँग्रेस केव्हाच संपली. आता दिसते ती पटोले काँग्रेस, केदार काँग्रेस, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची काँग्रेस आहे. पुढा-यांनी आपापल्या नावाने दुकानदारी चालवली आहे. तिकडे साखर कारखानदार आहेत, इकडे मेडिकल कॉलेजवाले. लोकांशी काही घेणेदेणे नाही.
Satyajeet Tambe नाशिकच्या निमित्ताने काँग्रेसची पार नाचक्की झाली. तुम्ही साधा नवरदेव बोहल्यावर उभा करू शकत नाही आणि गप्पा भाजपाशी पंगा घेण्याच्या करता? काटोलचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी लेटरबॉम्ब टाकला. हे आशिष म्हणजे काँग्रेसमधील सुब्रमण्यम् स्वामी आहेत. त्यांचे पिताश्री रणजितबाबू दोन वेळा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. तेही विदर्भावरच्या अन्यायाबद्दल खूप बोलायचे. ते आक्रमक झाले की, इंदिराजी त्यांना थेट प्रदेश अध्यक्ष करून टाकायच्या. ‘ना बास बजेगा, ना बासरी!’ Satyajeet Tambeआता तर त्यांच्या सुपुत्राने थेट पटोले यांना हटवा अशीच मागणी केली. पटोले यांच्या कारकिर्दीत काँग्रेस पाचव्या क्रमांकावर गेली असे सांगताना त्यांनी पाच नमुनेही सांगितले. पटोले यांनी संघाच्या एका कार्यकर्त्याला फोडून विधान परिषदेला उभे केले. संघाचा माणूस फोडला म्हणजे राहुलबॉस खूश होईल, असे पटोले यांना वाटले असावे. Satyajeet Tambe मात्र या कार्यकर्त्याकडे त्याच्या स्वतःच्या मताशिवाय काहीही नव्हते. त्यामुळे अखेरच्या क्षणी उमेदवार बदलला. पण मार खाल्लाच. भाई जगताप आले, मात्र चंद्रकांत हंडोरे पडले.
शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीत काँग्रेसच्या १० आमदारांनी दांडी मारली आणि आता तांबे यांच्या बंडखोरीला पटोले हेच जबाबदार आहेत, असा देशमुख यांचा आरोप आहे. Satyajeet Tambe त्यात दम असेलही. पण पटोले राहुल गांधींचे खास आहेत. पटोले हटणार नाहीत. मागणीच करायची तर देवेंद्र फडणवीस यांना भाजपामधून हटवा, असे त्यांनी मागायला पाहिजे होते. देवेंद्र लय भारी निघाल्याने काँग्रेसची पदोपदी नामुष्की सुरू आहे. समजा पटोले यांना बाजूला केले तर दुसरा आहे कोण? काँग्रेसमध्ये नेतेच संपले. आहेत ते पेपर टायगर्स. पोस्ट गेली की पुढारी संपला. Satyajeet Tambe पटोले यांचेच उदाहरण घ्या- आक्रमक आहेत, फिरतात. पण पक्षातच त्यांना कोणी मोजत नाही. त्यांनी स्वबळाचा नारा दिला तेव्हा मी लहान माणसाशी बोलत नाही, असे शरद पवार म्हणाले होते. आता पवार मोजत नाहीत म्हटल्यावर विषयच संपला. पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. पण महाआघाडीच्या अडीच वर्षांच्या राज्यात काँग्रेसवाल्यांनी त्यांना साधे मंत्रीही होऊ दिले नाही. Satyajeet Tambe खरी फजिती २०२४ मध्ये आहे. नागपूर लोकसभा लढायला काँग्रेसकडे कोण उमेदवार आहे? की वॉकओव्हर देणार? विधान परिषद निवडणुकीत एवढी भांडणे आहेत. Satyajeet Tambe २०२४ मध्ये तर हे तिघे एकमेकांचे कपडे फाडतील.