तरुण भारत लाईव्ह । मोरेश्वर बडगे । nana patole भांडणे, गटबाजी काँग्रेसच्या पाचवीला पुजली आहेत. मात्र सध्या जे सुरू आहे ते भयंकर आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीनिमित्ताने काँग्रेसमधला अंतर्गत कलह उफाळून आला आहे. nana patole विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातल्या नागपूर आणि अमरावतीची जागा काँग्रेसनेजिंकून धक्का दिला. पण विजयोत्सव साजरा करायचे सोडून काँग्रेसमध्ये रणकंदन माजले आहे. काका-पुतण्या किती उधम करू शकतात ते आपण राष्ट्रवादीत पाहतो आहोत. nana patole आता काँग्रेसमध्ये मामा-भाचे धिंगाणा घालत आहेत. nana patole हे सारे आमदारकीच्या एका तिकिटावरून सुरू झाले. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांना काँग्रेसने तिकीट दिले नाही. nana patole त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि निवडून आल्याने राजकारण पेटले आहे. nana patole ही आग एवढी भडकली की, काँग्रेस फुटायची पाळी आली. सत्यजित तांबे यांनी पत्रपरिषद घेऊन नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
nana patole निवडणुकीच्या संपूर्ण काळात मौनात गेलेले बाळासाहेब थोरात यांनाही आता वाचा फुटली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत आपण काम करू शकत नाही, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठवला. काय होणार काँग्रेसचे? राहुल गांधी यांच्या वाढलेल्या दाढीच्या गुंत्यात राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची दमछाक सुरू आहे. आणि इकडे महाराष्ट्रात काँग्रेसची शिवसेना व्हायला निघाली आहे. nana patole दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नगरच्या एका महिला नेत्याचे ट्विट आले होते. या महिलेला एका कार्यकर्त्याचा फोन आला. त्याने विचारले, आपण कुठल्या काँग्रेसमध्ये आहोत? बाळासाहेबांच्या काँग्रेसमध्ये आहोत की नानासाहेबांच्या? म्हणजे थोरातांच्या की पटोले यांच्या?nana patole मी काय सांगू कप्पाळ? असे म्हणत तिने फोन ठेवून दिला. नेत्यांच्या आपसातल्या सुंदोपसुंदीने काँग्रेस कुठे आणून ठेवली ते सांगायला हा एक फोन पुरेसा आहे. nana patole पक्षाचा एक ज्येष्ठ नेताच या प्रदेशाध्यक्षासोबत काम करणे शक्य नाही असे म्हणतो तर त्या पक्षाचे कसे व्हायचे? बरे, नाना पटोलेही झुकायला तयार नाहीत. दुसरा एखादा नेता असता तर लगेच राजीनामा फेकला असता.
मात्र आपल्याकडेही भरपूर मसाला आहे असे सांगत नानांनी दंड थोपटले. nana patole काँग्रेसचा आखाडा झाला आहे. पक्षाला घरच्या शेतीसारखे वागवले तर हेच होणार. थोरात आणि पटोले हे दोन ज्येष्ठ नेते. या दोघांमध्ये समन्वय, संवाद असलाच पाहिजे. पण मतभेद, मनभेद एवढे की, दोघे एकमेकांशी बोलायला तयार नाहीत. nana patole निकालानंतर नानांनी तांबे यांना अभिनंदनाचा साधा फोनही केला नाही. थोरातांचा नुकताच ७० वा वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या शुभेच्छा नानांनी मीडियामार्फत दिल्या. सत्यजित तांबे हा नवा चेहरा आहे. तो पटोले यांचा प्रतिस्पर्धी होऊ शकत नाही. nana patoleथोरात यांनी तर प्रदेशाध्यक्षाची खुर्ची नानांसाठी रिकामी केलेली. मग कटुता येते कुठे? nana patole पण आली. भाच्याला तिकीट मिळत नाही हे लक्षात येताच थोरात यांनी खांदा निखळल्याने आजारपणाचे पांघरूण ओढून घेतले. प्रत्येकाला तिकीट मिळू शकत नाही. एकाला दिले म्हणजे चार नाराज होणारच. nana patole या केसमध्ये सत्यजितच्या वडिलांना म्हणजे डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने तिकीट दिले होते. त्यांनी माघार घेऊन मुलाला पुढे केले. असा परस्पर व्यवहार कसा होऊ शकतो? nana patole मुलाला पुढे करायचे असेल तर तसे श्रेष्ठींशी बोलायला हवे होते. पण कुठेही संवाद झाला नाही.
nana patole अखेरच्या दिवशी एबी फॉर्म दिला जातो, तोही चुकीचा दिला जातो. साराच मामला संशयास्पद आहे. कुठेही पारदर्शकता नाही. नानाही गरम डोक्याचे. नाशिकला जाऊन त्यांनी तांबे कुटुंबाशी बोलायला हवे होते. त्यांनी तडकाफडकी तांबेंना निलंबित केले. त्यामुळे विषय आणखी चिघळला. nana patole थोरात आणि आम्हा कुटुंबाला बाजूला ढकलण्यासाठी षडयंत्र रचले होते असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे. हा सारा घोळ सुरू असताना अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण मूक प्रेक्षक बनले होते. या ज्येष्ठ नेत्यांनी धावपळ का केली नाही? काँग्रेसमध्ये सुभेदा-या झाल्या आहेत. प्रत्येकाने आपापले जिल्हे वाटून घेतले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या नेत्याची स्वतंत्र काँग्रेस नांदते आहे. nana patole सध्याचा वाद त्याचेच फळ. भाच्यावर बेतली म्हणून थोरातांना राजीनामा द्यावासा वाटला. जनतेच्या एखाद्या प्रश्नावर त्यांनी कधी राजीनामा दिला आहे? शरद पवारांच्या मोहात गेलात तर काय परिस्थिती येऊ शकते ती पाहा. अडीच वर्षांच्या सत्तेच्या मोहाने गेलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेची आज काय अवस्था आहे?
सेना फुटली, काँग्रेस त्या वाटेवर आहे. उद्या अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे यांची भांडी वाजू लागली तर आश्चर्य वाटायला नको. प्रदेशाध्यक्षाने कसे वागायचे नसते याचा आदर्श पटोले यांनी दाखवला आहे. nana patole सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर नाना लगेच हार घेऊन गेले असते तर हवा निवळली असती. पण पटोले यांनाही खुमखुमी आहे. राहुल गांधी नफरत छोडो म्हणतात आणि त्यांचे चेले नफरत जोडो करताहेत. nana patole कसे होणार? प्रदेश कार्यकारिणीपुढे हा विषय न्यायचे त्यांनी ठरवले आहे. सध्यातरी या वादात नाना एकटे पडलेले दिसत आहेत. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण या दिग्गज नेत्यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. विदर्भातलेही नेते त्यांच्या पाठीशी दिसत नाहीत. सुनील केदार, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत. एकूणच नानांचे सुरुवातीपासूनच कोणाशी फार पटले नाही. nana patole परवाच्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार जाहीर करायला नानांनी नखरे केले तेव्हा सुनील केदार यांनी परस्पर अडबाले यांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती. नाना आधीही एकटे होते आणि आज तर पूर्णपणे एकटे पडले आहेत.
तांबे प्रकरण नानांनी व्यवस्थित हाताळले नाही असेच बहुतेक नेते खाजगीत बोलतात. प्रदेशाध्यक्ष सर्वांना सोबत घेऊन चालणारा असावा लागतो. नाना म्हणजे हेडमास्तर. nana patole तांबे बेशिस्त वागले तर केला सस्पेंड. पक्ष असा चालत आणि वाढत नसतो. आल्या आल्या स्वबळाचा नारा देऊन नानांनी शरद पवारांची नाराजी ओढवून घेतली. मी लहान लोकांशी बोलत नाही असे नानांबद्दल पवार म्हणाले होते. नाना हा तसा आक्रमक नेता आहे. काँग्रेसने त्यांना व्यवस्थित वापरून घेतले असते तर काँग्रेसला बळ मिळाले असते. पण इथे तंगडी ओढण्यात एक से एक मास्टर आहेत. मग नानांचे काय होणार? nana patole अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांचे काय झाले? किती भांडले दोघं. काही झाले नाही. ही काँग्रेस आहे. ठंडा करके खाओ हा काँग्रेसचा जुना फंडा आहे. कंटाळून नानाच दुसरे घर शोधतील. नाही म्हणायला सत्यजित तांबे यांच्यासाठी त्यांनी भाजपचा दरवाजा उघडा करून दिलाच आहे.