---Advertisement---

रोड शो दरम्यान काँग्रेस नेत्याने लोकांवर उधळले पैसे, व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. दरम्यान, या तारखा जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस नेत्याच्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार रोड शो करतेवेळी लोकांवर ५००-५०० रुपयांच्या नोटा उडवताना दिसत आहेत. मंड्या जिल्ह्यातील बेनिवहल्ली येथे रोड शो करत असतानाचा डीके शिवकुमार यांचा हा व्हिडिओ आहे.

कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने श्रीरंगणपट्टणमध्ये ‘प्रजा ध्वनी यात्रा’ आयोजित केली होती. यावेळी बेनिवहल्ली येथे रोड शोदरम्यान डीके शिवकुमार काही लोकांवर नोटा फेकताना दिसले. दरम्यान, यावेळी लोकांच्या शेजारी ढोल-ताशे वाजवणार्‍या कलाकारांना डीके शिवकुमार हे बक्षीस म्हणून पैसे देत होते, असे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment