मुंबई । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम 2 ते 3 महिन्यांनी जाहीर होण्याची शक्यता असून मात्र त्यापूर्वी अनेक पक्षात इनकमिंग, आऊटगोईंग सुरु झालीय. अशातच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप काँग्रेसला मोठा धक्का देऊ शकते.
कारण काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर भाजपात प्रवेश करु शकतात. भाजप नेते उपाध्याय यांच्या भेटीनंतर आमदार अंतापुरकर यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. काल गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. आमदार अंतापुरकर भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यात येतो. नांदेड जिल्हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाण यांनी काँग्रेससोडून भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठवलय.