महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारचे निधन

नांदेड : नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली. त्यानंतर पहाटे ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळं त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्यामुळं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तसंच, त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता. अखेर काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला होता. तसंच, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेससाठी नांदेडमधील हा विजय महत्वपूर्ण होता. खासदार होण्याआधी वसंत चव्हाण महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले होते.

वंसत चव्हाण यांची राजकीय कारकीर्द 
– जन्म – 15 ऑगस्ट 1954
– 1987 साली नायगाव ग्राम पंचायतीचे सरपंच, 24 वर्ष सरपंच
– 1990 – जिल्हा परिषद सदस्य
– 2002 विधान परिषद सदस्य (राष्ट्रवादी)
– 2009 – विधानसभा सदस्य – अपक्ष
– 2014 – विधानसभय सदस्य – काँगेस
– 2024 – लोकसभा सदस्य – काँगेस