अक्कलकुव्यात काँग्रेसला खिंडार; ७५ कार्यकर्ते भाजपमध्ये ; प्रदेश महामंत्री विजय चौधरींकडून स्वागत

---Advertisement---

 

नंदुरबार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत भाजपमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश होत असून, शुक्रवारी (५ सप्टेंबर) भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते अक्कलकुवा तालुक्यातील काँग्रेसचे खापर येथील शहराध्यक्ष कांतिलाल पाडवी, ग्रामपंचायतीच्या सदस्या अरुणा पाडवी, वासुदेव पाडवी, तसेच कवली, सोजडान व राजमोही या गावांतील शेकडो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपच्या विजयपर्व या जिल्हा कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हाध्यक्ष नीलेश माळी, आमदार राजेश पाडवी, जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी, कैलास चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष विनोद कामे, शहराध्यक्ष नरेश कांकरिया, भीमसिंग राजपूत, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष नितेश पाडवी, मंदार चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी विजय चौधरी यांनी सांगितले की. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण भाजपमध्ये आला आहात, त्याबद्दल मी तुमचे स्वागत करतो. राज्यातील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देणारा कुठला पक्ष असेल, तर तो भाजप आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप शतप्रतिशत जिंकणार असून, जनतेलाही भाजपच्या कार्यकत्याँप्रति आदर निर्माण झाला आहे. भाजपचा कार्यकर्ता सतत कार्यशील असून, एक संकट सोबती म्हणून नेहमीच मदतीचा असल्याने आपण काळजी करू नका. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण भाजपमध्ये आला आहात, याबद्दल विजय चौधरी यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी ७५ कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सतत पक्षप्रवेश होत असून, हा विषय जिल्ह्यात सध्या चर्चेत आला आहे. विरोधी पक्षांनीही यामुळे धसका घेतला आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---