---Advertisement---

अंजाळे गावाजवळ मोठी दुर्घटना टळली, कंटेनकर अनियंत्रित होऊन घसरला

---Advertisement---

जळगाव : कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटून ऐन चढावावर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ ही घटना घडली असून, सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळकडून कंटेनर (आरजे ०९ जीबी ५६३४) यावलकडे येत होता. दरम्यान, अंजाळे येथील पुलाच्या चढावावर वेग कमी झाल्याने कंटेनकर अनियंत्रित होऊन मागील बाजुने वेगात सरकले. धक्कादायक म्हणजे, कंटेनरच्या मागे एक प्रवाशी रिक्षा होती. त्यावर कंटेनर धडकणार तोचं चालकाने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत त्यास थांबवलयाने मोठी दुर्घटना टळली.

अंजाळे घाटात रस्त्यावर धोकादायक वळणासह मोठा उतार असल्याने या ठिकाणी भुसावळकडून येणारी वाहने हे अतिवेगाने येतात. यामुळे अनेक लहानमोठे अपघात येत आहेत. भविष्यात येथे भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर तात्काळ वाहनांचे वेग नियंणत्रित करण्यासाठी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी किमान तीन-चार ठिकाणी गतीरोधक बसवावे, अशी मागणी वाहनधारक करत आहे.

तीन वाहनांचा अपघात; १५ मजूर झाले जखमी

फैजपूर : आमोदा ते पिंपरूळ फाटा दरम्यान बुधवारी सकाळी तीन वाहनांचा अपघात होऊन त्यात एका वाहनातील केळी वाहतूक करणारे जवळपास १५ मजूर जखमी झाले. ही घटना सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

आमोदा गावाजवळील या महिन्यातील अपघाताची ही तिसरी घटना आहे. शनिवारी रात्री याच रस्त्यावर इंदोरकडे जाणारी ट्रॅव्हल उलटली होती. त्यातही ५० प्रवासी होते, तर पंधरा दिवसांपूर्वी दोन रिक्षांच्या अपघातात विद्यार्थिनी ठार झाली होती. मोर नदीच्या पुढे मिनी ट्रक व दोन ट्रक यांच्यात अपघात झाला. त्यामुळे दोन ते तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.

मोर नदीच्या पुलाजवळ असलेल्या वळणावर भुसावळकडून येणारा मालवाहू ट्रक हा दुसऱ्या मालवाहू ट्रकला ओव्हरटेक करीत बाजूच्या ट्रकला कट लागला, तसेच फैजपूरकडून येणाऱ्या एकनाथ कोळी, सोपान कोळी, मंगला सुरवाडे, रितिक पांडे, रामा तायडे, मधुकर कोचुरे, रंजना कोळी, सागर गाडे, माया जाधव, अमर जाधव, प्रमिला कोळी, सुशीला कोळी, नंदा गाडे, सचिन जाधव आदी. हे सर्व फैजपूर परिसरातील रहिवासी आहेत.

मिनी ट्रकला धडक बसल्याने तो झाडावर जाऊन आदळला. यात मिनी ट्रकचा चालक व त्यातील मजून जखमी झाले. मिनी ट्रक झाडाला धडकून तेथेच थांबली, अन्यथा जवळच असलेल्या खोल खड्यात जाऊन अनर्थ घडला असता. बुधवारी फैजपूर येथील बकरी बाजारामुळे फैजपूर ते यावल रस्त्यावरील वाहतूक आमोदयाकडून वळविण्यात आली होती. त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळसुद्धा या रस्त्यावर होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व वाहतूक सुरळीत केली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment