यावल शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, शिवसेनेची मागणी

---Advertisement---

 

यावल : शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या मोकाट कुत्र्यांनी शेळीला ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या ,मोकाट कुत्र्यांचा नगर परिषदेने बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हा पुर्व विभागाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन नगर परिषदेच्या आरोग्य विभागा कडे केली आहे.

यावल शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढ झाली आहे. त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून नागरीकांना या मोकाट कुत्र्यांपासून धोका र्निमाण झाला आहे तरी यावल नगर परिषदने या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा वेळीच तात्काळ बंदोबस्त नगर परिषदने करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावल शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख रस्ते व विस्तारित वसाहती मध्ये गेल्या अनेक दिवसांपासुन मोकाट फ़िरणाऱ्या कुत्र्यांनी आपला उपद्रव वाढवला असुन,दुचाकी वाहनधारकांच्या अंगावर तसेच शाळकरी बाळांच्या अंगावर धावुन येणे हा प्रकार रोजचा झाला आहे.

विस्तारित क्षेत्रातील अनेक लोकांच्या पाळीव शेळ्या देखील मारल्या गेल्या आहे. दरम्यान शहरात या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांकडून काही मोठी अप्रिय घटना होवु नये याची काळजी घेणे नगर परिषद प्रशासनाच्या आरोग्य विभागाचे कर्तव्य असल्याची जाणीव करून देत मोकाट कुत्र्यांचा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा पुर्व विभागाचे उपसंघटक नितिन सोनार यांनी यावल नगर परिषदच्या आरोग्य विभागाचे प्रभारी अधिकारी शेळके यांच्याशी भेट घेत उपरोक्त विषयावर मागणीद्वारे केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---