मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा… नशिराबादकरांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा

---Advertisement---

 

नशिराबाद : गावात सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव वाढला असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून अचानकपणे गावात भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. गावकऱ्यांकडून कदाचित आजूबाजूच्या शहरांमधून पकडून आणलेले कुत्रे नशिराबाद परिसरात सोडले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम आठ दिवसात सुरु केली नाही तर नगरपालिकेवर गुरे ढोराना बांधण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांना देण्यात आला आहे.

गावात शाळकरी मुलांच्या मागे हे कुत्रे धावत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी दोन-तीन वेळा भटक्या कुत्र्यांनी बकऱ्यांवर हल्ला करून त्यांना रक्तबंबाळ केले होते. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः वयोवृद्ध नागरिक, लहान मुले आणि शाळकरी विद्यार्थी यांना या कुत्र्यांपासून अधिक धोका जाणवू लागला आहे. भटक्या कुत्र्यांचे टोळके सर्रास रस्त्यावर फिरताना दिसत असून कोणत्याही क्षणी गंभीर अपघात अथवा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भटक्या कुत्र्यांबाबत नगरपरिषदेला ग्रामस्थांनी निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे भटक्या कुत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा दुर्दैवी घटनेची नशिराबादमध्ये पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वेळीच कठोर पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

नशिराबाद येथील रहिवासी म्हसोबा टाकी व परिसरामध्ये कुत्र्यांनी खूप हैदोस माजविला आहे. खालची आळी परिसरातील जवळजवळ अंदाजे २५ शेतकरी यांच्या प्राण्यांचे लचके तोडून त्या बऱ्याच प्राण्यांना आपले जीव गमावा लागला आहे.

---Advertisement---

 

तरी नशिराबाद परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचे संख्या खूप वाढत आहे. यामुळे ग्रामस्थ नाहक त्रास सहन करावा लागत असून यासमस्येकडे नगर परिषदेने तातडीने लक्ष देऊन भटक्या कुत्रांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. जर नगरपरिषदेने आठ दिवसात कुत्रे पकडून नेण्याची मोहीम सुरू केली नाहीतर सर्व शेतकरी आठ दिवसानंतर नगरपालिकेवर त्यांचे गुरेढोरे बांधतील असा इशारा सुद्धा यावेळी निवेदन देताना देण्यात आला.

निवेदन देताना माजी सरपंच पंकज महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अध्यक्ष निलेश रोटे ,भूषण कोल्हे, शेतकरी कीरण बोंडे , पिंटू बोंडे, पराग बोंडे, लालचंद कावळे, तुषार चौधरी, गुणवंत नारखेडे , चंदन महाजन, अर्जुन कोल्हे, सर्व शेतकरी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---