सावधान : मुंब्र्यात ऑनलाइन गेम द्वारे ४०० हिंदूंचे धर्मांतर

मुंबई : देशभरात गाजत असलेल्या ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे ठाण्यातील मुंब्रा पर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणात आता धक्कादायक अपडेट समोर आली आहे. मुंबईजवळील मुंब्रा भागात ४०० हिंदू मुलांचे धर्मांतर झाल्याचा एका उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी गौप्यस्फोट केला आहे. गाझियाबाद पोलीस आयुक्त निपुण अग्रवाल यांनी माहितीची पुष्टी केली आहे. याप्रकरणी पोलीसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. गुजरातमधून आलेल्या एका कॉलमुळे ४०० हिंदू मुलांचे धर्मांतर झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

ऑनलाइन गेमच्या नावाखाली धर्मांतर

पोलिसांनी सांगितले की, काही मुस्लीम मुले त्यांची नावे बदलून त्यांच्यासोबत ऑनलाइन गेम फॉर नाईट गेम अॅपवर गेम खेळत. गेम हरल्यावर त्यांना जिंकण्यासाठी झाकीर नाईकचे आयाते पठण करायला लावत. त्यानंतर त्यांचा विश्वास जिंकून यानंतर डिसकॉर्ड अॅपच्या माध्यमातून मुस्लीम मुले युजर आयडी बनवून हिंदू मुलांशी चॅट करत, त्यांना इस्लामिक रितीरिवाज अंगीकारण्यासाठी प्रवृत्त करत, भाषणे दाखवून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रोत्साहित करत आणि इस्लामची माहिती देत.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल रहमानने दोन वर्षांपूर्वी या दोन मुलांची भेट घेतली होती, जे गेमिंग अॅपच्या गोंधळात पडून इस्लामकडे आकर्षित झाले होते. यानंतर त्यांनी तरुणांना सांगितले की, इस्लाम हा सर्वात महत्त्वाचा धर्म आहे. यानंतर आरोपीने दोन्ही मुलांना फसवण्यात यश मिळवले. त्यानंतर दोन्ही मुलांना पाच वेळा नमाज पठन करण्यात सांगितले. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.