Corona Cases : रुग्णसंख्येत आज पुन्हा वाढ, 15 रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रात किती?

corona :  देशासह राज्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. देशात गेल्या २४ तासांत ४ हजार ४३५ रुग्ण आढळले असून १५ जणांना आपला जीव गमवावा लागला. महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.  दरम्यान, ४ रोजी  देशात 3 हजार 38 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती आणि 9 जणांचा मृत्यू झाला होता.

गेल्या 24 तासात भारतात 4,435 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 15 जणांना आपला जीव गमवावा लागला. यापूर्वी मंगळवारी (4 एप्रिल) देशात 3,038 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती आणि 9 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान दिवसागणिक हा नव्या रूग्णांचा वाढता आकडा पाहून देशातील आरोग्य यंत्रणा अलर्ट वर आली आहे. देशात सध्या सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 23,091 झाली आहे.

एकट्या दिल्ली बोलायचे झाले तर गेल्या 24 तासात एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून महाराष्ट्रात 711 रुग्ण आढळले असून 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उत्तराखंड या छोट्या राज्यातही अवघ्या 20 दिवसांत तीन मृत्यूची नोंद झाली आहे.

मंगळवारी, महाराष्ट्रात 711 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 218 रुग्ण मुंबईत आढळले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोना प्रादुर्भावामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3,792 आहे. राज्यात गेल्या सात दिवसांत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा या सहा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे.