Corona : नव्या व्हेरिएंटनं पुन्हा टेन्शन वाढलं ;मास्क लावा

Corona कोरोनाबाधितांची संख्या आता पुन्हा झपाट्यानं वाढतेय. कोरोनाचा उपप्रकार असलेल्या JN.1 चा प्रसार वेगानं होतोय. केरळमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण सापडला होता. आता जवळपास सहा राज्यात या विषाणूनं शिरकाव केलाय.. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील बाधितांची संख्याही चिंताजनक आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं पुन्हा टेन्शन वाढल आहे. रुग्णवाढीमुळे पुन्हा चौथा बुस्टर डोस घ्यावा लागणार का? अशी चर्चा देखील सुरु झाली झाली आहे.

चौथी लस घ्यावी लागणार ?
देशात सध्या 3 हजार 742 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. 24 डिसेंबर रोजी देशातील सहा राज्यांत 63 रुग्ण JN.1 चे रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लशीसाठी वाट पाहावी लागली होती. त्यादरम्यान अनेकांचे मृत्यू देखील झाले होते.दुसऱ्या लाटेनंतर अनेकांनी बुस्टर डोसही घेतला होता. त्यामुळे आता यावेळी चौथी लस घ्यावी लागणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. मात्र चौथ्यांदा लस किंवा बुस्टर डोस घेण्याची गरज नाही असं तज्ञांनी स्पष्ट केलंय..जागतिक आरोग्य संघटनेनंही हा विषाणू लोकांच्या आरोग्यासाठी फार धोकादायक नसल्याचं म्हटलंय. सध्या अस्तित्वात असलेल्या लशी या विषाणूचा प्रतिकार करत असून रुग्णांना धोक्यापासून वाचवतायत. असं निवेदन जागतिक आरोग्य संघटनेनं दिलंय.

गर्दीतही जाताना मास्क
देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे.. गेल्या 24 तासांत 628 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय.. तर केरळमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात गेल्या 24 तासांत 50 नवे रुग्ण आढळले आहेत.. तर केरळमध्ये 128 आणि कर्नाटकमध्ये 73 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय.. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने काळजी घेण्याचं आवाहन केलंय.. नववर्षाचं स्वागत करताना तसंच गर्दीतही जाताना मास्क लावण्याचं आवाहन सरकारने केलंय.

ठाण्यामध्ये  पाच रुग्ण सापडले
ठाण्यामध्ये कोरोनाच्या जेएन वन व्हेरियंटचे पाच रुग्ण सापडलेत. त्यात एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. ठाण्यात सध्या कोरोनाचे 28 रुग्ण आहेत. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी घाबरण्याचं कारण नाही असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय.. मास्क लावा तसंच काळजी घेण्याचं आवाहनही अजित पवारांनी केलंय..