नवी दिल्ली : भारतात आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात दिवसभरात ११ हजारांहून अधिक रुग्ण रुग्ण आढळले आहेत. तर गुरुवारी रुग्णांची संख्या १२ हजारांहून अधिक होती.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी सकाळी कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये घट पाहायला मिळाली. देशात सक्रिय रुग्णांची संख्या ६६ हजार १७० इतकी झाली आहे. या सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ११,६९२ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत ४.४८ कोटी रुग्णांची नोंद झाली आहे. आकडेवारीनुसार, शुक्रवारी २८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आतापर्यंत ५,३१,२५८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.