---Advertisement---
चाळीसगाव : येथील माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर अमानुषपणे कोयत्याने हल्ला करणाऱ्या तिघांना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी तिघांची सरळ पोलिस ठाण्यापासून कोर्टापर्यंत पायीच वरात काढली.
दि. २६ रोजी रात्री प्रभाकर चौधरी यांच्यावर कोयता तलवारीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. नाशिक येथील अशोका
हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान आरोपी मिळतं नसल्याने ३० रोजी महिला व नागरिकांनी मूक मोर्चा काढत आरोपीना त्वरित अटक करावी, त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्या अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सोमा दगडू चौधरी, सनी उर्फ हरीश आबा पाटील, गौरव आधार चौधरी अशा तिघांना ताब्यात घेतले. यातील एक आरोपी पसार असून त्याला देखील लवकर ताब्यात घेऊ असा आत्मविश्वास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी व्यक्त केला. दरम्यान, या तिघांना चाळीसगाव येथील सत्र न्यायालयात हजर केले असता आरोपींनी वापरलेली हत्यारे, गुन्ह्यात आणखी कुणाचा समावेश आहे का? चार दिवस आरोपी कुठे कुठे राहिले, गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करावयाचे असल्याने आरोपींना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलीस निरीक्षक मनेळ यांनी केली असता न्यायालयाने आरोर्पीना ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.