देशातील पहिले SUV इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

तरुण भारत लाईव्ह ।२३ फेब्रुवारी २०२३। इलेक्ट्रिक टू व्हीलर मध्ये आणखी एका स्कूटरची एन्ट्री झाली आहे. रिवर कंपनीने इंडी ई-स्कूटर (Indie e-scooter) रिवर कंपनीने दावा केला आहे की हे देशातील पहिले एसयूव्ही स्कूटर असून हे २०० किलो वजन घेवून आरामात धावू शकते या स्कूटरचे फीचर्स आणि किंमत जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

रिवर कंपनीचे  इंडी ई-स्कूटर हे देशातील पहिले एसयूव्ही स्कूटर आहे तसेच हे २०० किलो वजन घेवून आरामात धावू शकते असा दावा रिवर कंपनीने केला आहे. या स्कूटरचे फीचर्स असे आहेत की, इंडी ई-स्कूटरमध्ये कंपनी ने 4 kWh क्षमतेची बॅटरी पॅक दिले असून  6.7 kW पॉवरचे इलेक्ट्रिक मोटरशी जोडले आहे. या स्कूटरच्या बॅटरीला ५ तासात शून्य ते ८० टक्क्यापर्यंत चार्ज करता येवू शकते. इंडी ई-स्कूटरमध्ये एकूण ५५ लीटरचे स्पेस मिळते. ज्यात ४३ लीटर बूट स्पेस आणि १२ लीटर ग्लव बॉक्सचे स्पेसचा समावेश आहे.

एकदा फुल चार्ज केल्यानंतर या स्कूटरमध्ये १२० किमीची रायडिंग रेंज (इको मोड) वर मिळते. यासोबत ९० किमी प्रति तासची टॉप स्पीड मिळते. कंपनीचा दावा आहे की, हे स्कूटर ई स्कूटर सेगमेंट मधील पहिले आहे. जे विविध रस्त्यांवर हाय रायडिंग पोझिशन, जबरदस्त रायडिंग आणि वेगाला परवानगी देते. इंडी ई-स्कूटरला १ लाख २५ हजार रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत आणले आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रिक गाडी खरेदी करायची असेल इंडी ई-स्कूटर तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.