प्रेम विवाहवरून तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी जळगावात घडली. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. एकीकडे प्रेमविवाहतून जावयाच्या खुनाची घटना चर्चेत असताना, दुसरी खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्याने लग्नाच्या पाच वर्षांनतर टोकाचे पाऊल उचलले आहे. नेमकं काय आणि कुठलं आहे प्रकरण ? जाणून घेऊयात…
पती-पत्नीने विष प्राशन केल्यानंतर अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यानंतर तातडीने त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. या दुःखद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड
पाच वर्षांपूर्वी झालं होतं लग्न
दोघांमध्ये बराच काळ प्रेमसंबंध होते. पाच वर्षांपूर्वी त्यांनी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्न केलं होतं. मात्र, कुटुंबीयांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते. प्रेमाखातर घर सोडलेल्या या जोडप्याने संघर्षमय जीवन सुरू केले होते.
हेही वाचा : Sharon Raj murder case : विश्वास ठेवावा तर कुणावर ? प्रेयसीनेच केला घात, अखेर फाशीची शिक्षा
एकत्र मृत्यूने समाज हादरला
या घटनेने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आत्महत्येच्या पाठीमागील कारण शोधण्यासाठी दोघांच्या कुटुंबीय आणि परिचितांकडून चौकशी सुरू आहे. या जोडप्याच्या आत्महत्येमुळे समाजात दुःख आणि हतबलतेची भावना पसरली आहे.
कानपूरमधील घटना
उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हे प्रकरण आहे. सलोनी सचान आणि अलकेश सचान असे मृत जोडप्याचे नाव आहे. मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नसून, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.