पुणे : पुण्यात कौटुंबिक वादातून झालेल्या भयंकर घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन चुलत भावांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान एका भीषण हत्येत झाले.
संतप्त झालेल्या भावाने पाचव्या मजल्यावरून दुसऱ्या भावाला खाली ढकलल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना पुण्यातील नांदेड सिटीजवळील धायरीगाव परिसरातील मतेनगर येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमर किसन देशमुख (वय 34) आणि राजू भुरेलाल देशमुख हे चुलत भाऊ असून, दोघेही मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी आहेत. काही वर्षांपूर्वी ते पुण्यात आले होते आणि धायरी परिसरात असलेल्या एका सोनपापडी बनवणाऱ्या कारखान्यात काम करत होते.
हेही वाचा : हृदयद्रावक! एकीकडे बारावीचे पेपर अन् इकडे वडिलांचं निधन, चेतनवर कोसळला दुःखाचा डोंगर
कौटुंबिक वादातून राजू देशमुख हा अमर देशमुखच्या पत्नीला वारंवार शिवीगाळ करीत होता. या कारणावरून दोघांमध्ये वाद वाढत गेला. वाद विकोपाला गेल्यानंतर अमर देशमुखने राजू देशमुखवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
या भांडणामुळे आरोपी राजू देशमुखने संतापाच्या भरात अमरला जोरात ढकलले. तो थेट पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला.
या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. गंभीर जखमी अवस्थेत अमर देशमुखला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी राजू देशमुखला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत मोहपत हरीराम साहारे (वय 36, रा. धायरीगाव, पुणे) यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
वर्गमित्राकडून त्रास; इंजिनिअरिंग विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल
पुणे : पुण्यात ताथवडे येथे एका 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. संबंधित प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना तिच्या मृत्युमागील धक्कादायक सत्य समजले. वर्गमित्राकडून वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
साहिती कलुगोटाला रेड्डी (वय 20, रा. अक्षरा इलेमेंटा सोसायटी, ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रणव राजेंद्र डोंगरे (वय 20, रा. मयूर समृद्धी, आकुर्डी गावठाण) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान साहितीने आत्महत्येपूर्वी तिच्या मोबाईलमध्ये अनेक व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करून ठेवले होते. तसेच काही महत्त्वाचे पुरावे मित्रांना पाठवून तिच्या मोबाईलचा पासवर्ड आणि ठिकाण सांगितले होते. तिच्या मित्रांनी हा प्रकार तिच्या पालकांना सांगितल्यानंतर पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला. त्यातील रेकॉर्डिंगच्या आधारे पोलिसांनी डोंगरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरे याने साहितीला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास दिला होता. वारंवार अपमानास्पद वागणूक आणि शिवीगाळ केल्याने ती प्रचंड तणावाखाली होती. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.