Covid-19 : कोरोनामुळे अनेक दीर्घकालीन शारीरिक समस्या

Covid-19:  अनेक दीर्घकालीन शारीरिक समस्यांना समोरे जावे लागते आहे अशी धक्कादायक माहितीसमोर आली आहे. मेरिकन मेडिकल असोसिएशन पॉडकास्टमध्ये डॉक्टर रॅम्बोड रूहबख्श यांनी म्हटले की, कोविड होऊन गेल्यानंतर रुग्णाला मधुमेह (Diabetes), मूत्रपिंडाचा आजार, अवयव निकामी होणे आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

रिसर्चनुसार ६५ दशलक्ष लोक सध्या कोविडच्या आजाराने त्रस्त आहेत. परंतु, यामध्ये मुलांचा समावेश कमी प्रमाणात आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉन नंतरच्या प्रकारांमध्ये पुन्हा संसर्ग झाल्यानंतर कोविडमध्ये वाढ झाल्याचेही लक्षात आले आहे. कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे.

1. Corona Variant JN.1 लक्षणे कोणती?

तज्ज्ञांच्या मते कोविड १९ च्या वेगवेगळ्या प्रकारामुळे लक्षणांमध्ये सौम्य बदल पाहायला मिळत आहे. कोविड-१९ ची नवीन लक्षणे  जाणून घेऊया

नाक गळती

सर्दी

खोकला

डोकेदुखी

अशक्तपणा आणि थकवा

स्नायू दुखणे

घसा खवखवणे

निद्रानाशाची समस्या

चिंता

सध्या हिवाळा सुरु असल्यामुळे श्वसनांच्या संबंधित अनेक रोगांची लागण झालेली पाहायला मिळत आहे. खोकला, घसा खवखवणे, शिंका येणे, थकवा आणि डोकेदुखी ही सर्वात सामान्य लक्षणे सांगण्यात आले आहे.