cricketer: विजयाचे सेलिब्रेशन : कर्नाटकच्या माजी क्रिकेटपटूचा हृदयविकाराने मृत्यू

cricketer :  मैदानावर विजयाचा आनंद साजरा करताना   कर्नाटकचे माजी क्रिकेटपटू के होयसला (वय ३४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या छातीत दुखू लागल्यानंतर तो मैदानातच बेशुद्ध पडला.

 

दक्षिण विभागीय स्पर्धेतील कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यातील सामना बंगळुरू येथील आरएसआय क्रिकेट मैदानावर झाला. या सामन्यात कर्नाटकच्या विजयानंतर आनंद साजरा करत असताना छातीत दुखू लागल्याने होयसाला मैदानातच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णवाहिकेने बंगळुरू येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

 

रुग्णालयाचे डीन डॉ. मनोज कुमार म्हणाले की, के होयसला यांना रुग्णालयात आणले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. पोस्टमार्टमनंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या वृत्ताने भारतीय क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

के होयसाला हा अष्टपैलू खेळाडू होता, मधल्या फळीत फलंदाजी करत असे. तसेच तो वेगवान गोलंदाजीही करत होता. होयसाला २५ वर्षांखालील गटात कर्नाटककडून खेळला आहे. याशिवाय तो कर्नाटक प्रीमियर लीगमध्येही खेळला होता.

“एजिस साउथ झोन स्पर्धेदरम्यान कर्नाटकचा क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज होयसला यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. या दु:खाच्या प्रसंगी आम्ही त्यांचे कुटुंब आणि मित्रांसोबत आहेत.

दिनेश गुंडू राव, कर्नाटक सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री