भुसावळातील गुन्हेगारी पुन्हा ऐरणीवर: कट्ट्याच्या धाकावर मागितली खंडणी

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : रस्त्याने जाणार्‍या चौघा तरुणांनी खंडणी न दिल्याने त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून एकाच्या डोक्याला कट्टा लावण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील श्रीराम नगरात शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगारी निखील राजपूतसह चौघांविरोधात खंडणीसह, आर्म ऍक्ट अन्वये बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र अटकेच्या भीतीने रात्रीच आरोपी पसार झाले असून त्यांच्या शोधार्थ बाजारपेठ पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

खंडणी न दिल्याने डोक्याला लावले पिस्टल व रॉडने केली मारहाण

बाजारपेठ पोलिसात तक्रारदार जय मनोज जाधव (२२, वाल्मिक नगर, जामनेर रोड, भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांच्यासह मित्र अमर देविदास कसोटे, कुणाल राजू शिंदे व आकाश गणेश ङ्गबियानी आदी वाल्मीक नगर भागात गप्पा करीत होते. मित्र अमर कसोटेला सोडण्यासाठी दुचाकीने श्रीराम नगरात गेल्यानंतर दत्त नगर, हनुमान मंदिराजवळ संशयित निखील राजपूतसह अक्षय न्हावकर उर्ङ्ग थापा, अभिषेक शर्मा, पवन चौधरी यांनी रस्ता अडवला व इधर आने का नही म्हणत, गली मे आना है तो पैसा भरना पडेगा म्हणत संशयितांनी अमर कसोटीचे गच्ची पकडून त्याच्या कानशीलाला कट्टा लावत पैशांची मागणी केली. तसेच अन्य संशयितांनी मित्रांचे खिसे तपासले मात्र रक्कम न मिळाल्याने निखील राजपूतने यांच्याकडे पैसे नसल्याचे यांचे हातपाय तोडून टाका , असे सांगितल्याने अन्य संशयितांनी लोखंडी रॉडने मारहाण सुरू केली. अमर व जय यांच्या डोक्याला लोखंडी रॉड मारण्यात आला. अन्य दोघा मित्रांना पायावर रॉड मारण्यात आला. यात आकाश हा दुचाकी घेवून तिथून निसटण्यात यशस्वी झाला. मात्र आरोपींनी कुणाल राजू शिंदे याची दुचाकी (एम.एच.१९ सी.डी.९३०८) ला रॉडने मारून तिचे नुकसान केले. मारहाण सुरू असताना दहशतीमुळे नागरीकांनी घरांचे दरवाजे लावून घेतले. कुणीही मदतीसाठी बाहेर आले नाही.

घर खाली करण्यासाठी दिली धमकी

जखमी अवस्थेत तरुण बाजारपेठ पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांना मेमो दिल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. मात्र याचवेळी चौघा आरोपींनी अमर देविदास कसोटे याच्या घरी जावून त्याच्या कुटुंबियांना धमकावत दोन दिवसात घर खाली करण्याची धमकी दिली. अन्यथा मोठ्या मुलाला मारले आहे, छोट्याला देखील मारू, अशी धमकी देत पळ काढला.

रात्रीच झाले संशयीत पसार

या गुन्ह्याप्रकरणी जय मनोज जाधव (२२, वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) याच्या ङ्गिर्यादीवरून निखील राजपूत, अक्षय न्हावकर उर्ङ्ग थापा, अभिषेक शर्मा, पवन चौधरी यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित शनिवारी रात्रीच पसार झाले असून त्यांच्या शोधार्थ बाजारपेठ पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.