नागपुरात सिगारेटवरून असा वाद पेटला की एका तरुणाची काही जणांनी हत्या केली. प्रकरण हुडकेश्वर भागातील आहे. येथे 28 वर्षीय रणजीत राठोडने पान दुकानातून सिगारेट विकत घेतली. याच दुकानातून आणखी दोन मुलींनीही सिगारेट विकत घेतल्या. एका मुलीने रणजीतच्या चेहऱ्यावर सिगारेटचा धूर सोडला. त्यामुळे रणजीतला राग आला. असे का केले असे त्याने मुलीला विचारले. या मुद्द्यावर तरुणीने त्याच्याची वाद घातला. तरुणीसोबत उभ्या असलेल्या तिच्या मैत्रिणीचीही रणजीतशी हाणामारी झाली. त्यानंतर तरुणीने तिच्या एका मित्रालाला फोन करून तिथे बोलावले. त्यानंतर तिघांनी मिळून रणजीतला एवढी मारहाण केली की तो गंभीर जखमी झाला. रणजीतला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मरण्यापूर्वी रणजीतने भांडणाचा व्हिडिओही बनवला होता. त्याआधारे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
त्याचवेळी शेजारी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही खुनाची ही घटना कैद झाली आहे. पोलीस सध्या सर्व आरोपींची चौकशी करत आहेत. जयश्री पणजरे ( 30), सविता सायरे (24) आणि आकाश राऊत ( 26) अशी आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत रणजित राठोड यांचे नागपुरात कपड्यांचे दुकान होते. रविवारी संध्याकाळी उशिरा रणजीतने जवळच्या दुकानातून सिगारेट विकत घेतली. जयश्री आणि तिची मैत्रिण सविता यांनीही तेथून सिगारेट विकत घेतली. यादरम्यान जयश्रीने रणजीतच्या चेहऱ्यावर धूर सोडला. त्यानंतर रणजीतने त्याचा जाब विचारला. यावेळी जयश्री आणि सविता यांनी रणजीतला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रणजीतने त्याचा व्हिडीओ बनवायला सुरुवात केल्यावर त्यांनी त्यांचा मित्र आकाशला फोन करून तिथे बोलावले.
तिघांनी मिळून रणजीतला एवढी मारहाण केली की तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी रणजीतला मृत घोषित केले. तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांना न्यायालयात हजर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. दुसरीकडे, मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून मयत रणजीतच्या कुटुंबीयांची दुरवस्था झाली असून ते रडत आहेत.