पाचोरा : पाचोऱ्यात नाकाबंदी दरम्यान गांजा बाळगताना तरुण आढळून आला. त्यास मुद्देमालासह घटक करण्यात आली असून, पाचोरा न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जळगाव चौफुली पाचोरा येथे 3 रोजी १० वा जे च्या सुमारास वरखेडी नाका नाकाबंदी करीत असतांना सार्वजनिक जागी आरोपी साई ज्ञानेश्वर चित्ते १९) (रा.जळगाव चौफुली)हा तरुण बेकायदेशीर रित्या गांजा बालगताना आढळून आला असून त्यास मुद्देमाल सह अटक करण्यात आली.
त्याच्याकडून 1400 रूपये किंमतीच्या एकुण 07 प्लॅस्टीकच्या बंद पुड्या, 56.500 ग्रम वजनाच्या, सदर पुड्यामध्ये हिरव्या रंगाचा शेंडे व फुले असलेला अंमली पदार्थ गांज्या वास घेवुन खात्री केलेला कि.अ. (पिशवीतील ) 2,000 रूपये किंमतीच्या एकुण 40 प्लॅस्टीकच्या पिशवीत गाठ मारलेली त्यात हिरव्या रंगाचा ओलसर पदार्थाची वडी 02
किलो वजनाचा अंमली पदार्थ भांग वास घेवुन खात्री केलेला कि.अ.(पिशवीतील ) 910 रूपये रोख एकूण-4,310/- रूपये
घटने प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष सुरेश राजपूत यांनी दिलेल्या फिर्याद वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटकेतील आरोपी तरुणास पाचोरा न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.