चोरीच्या गुन्ह्यात आरोपीस ताब्यात घेत त्याचेकडुन रोख रुपये व मोबाईल फोन जप्त;चाळीसगांव पोलिसांची कारवाई
पाचोरा : मोबाईल चोरीच्या गुन्हयातील आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांनी धुळे येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख रक्कमसह मोबाईल जप्त करण्यात आले. आनंद राजेंद्र सरोदे ( 45, रा. गल्ली नं. 7 पारोळा रोड धुळे ता. जि. धुळे) असे आरोपीचे नाव आहे.
चाळीसगाव शहरातील एम.जे. नगरात रहिवासी असलेले फिर्यादी विनोद प्रकाश बारी (32) यांचे शिवाजी चौकातील जगेश्वर पापड केंद्र, पिठाची गिरणी आहे. या कंपनीतून 7000/- रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन व 3320/- रु. रोख असा एकुण 10,320 रुपये किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेलेबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 350/2024 भा.न्या. सं. कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल फोन, रोख रुपये व अज्ञात आरोपीतांचा शोध घेणेकामी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांचे पथक स्थापन करुन त्यांना योग्य त्या सुचना देवुन रवाना केले. पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालाचा व अज्ञात आरोपीताचा गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहीतीच्या आधारे चाळीसगाव शहरात बस स्थानकाचे पाठीमागील परीसरात शोध घेतला असता तो मिळुन आल्याने आरोपी नामे आनंद राजेंद्र सरोदे (वय- 45) ( रा. गल्ली नं. 7 पारोळा रोड धुळे ता. जि. धुळे) यास ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन व 3320/- रुपये रोख असा एकुण 10,320/- रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हीपोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार), सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांचे सुचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ राहुल सोनवणे, पोना भुषण पाटील, पोना महेंद्र पाटील, पोकॉ विजय पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकों रविंद्र बच्छे, पोकों पवन पाटील, पोकॉ राकेश महाजन यांचे पथकाने ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ राहुल सोनवणे व पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहेत.
दरम्यान, चाळीसगाव शहरातील व्यावसायीकांनी आपले दुकानात सी.सी.टि.व्ही कॅमेरे बसवुन घ्यावेत तसेच कोणी संशयीत इसम आपले दुकानात येत- जात असेल तर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन दुरध्वनी क्र. 02589-222077 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.