---Advertisement---

स्थानिक गुन्हा शाखा जळगावची कामगिरी ; गावठी कट्ट्यासह दोघांना घेतले ताब्यात

---Advertisement---

जळगाव : रावेर तालुक्यात पाल येथे दोन गावठी कट्टे विक्रेत्यांना जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करीत अटक केली आहे. त्यांचा विरोधात रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी (८ जून) गुप्त माहिती देणाऱ्या एकाने मध्यप्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेचे स. फौ. रवी नरवाडे व पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे यांना गोपनीय माहिती दिली. यानुसार, मध्यप्रदेशातील दोन व्यक्ती गावठी कट्टे विक्रीच्या उद्देशाने महाराष्ट्रात येत आहे. ते पाल, ता. रावेर मार्गे जाणार आहेत.

ही गोपनीय माहिती मिळताच रवी नरवाडे यांनी तत्काळ ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविली. संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप. निरीक्षक शरद बागल, स. फौ. रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ. नितीन बाविस्कर, पो.कॉ. बबन पाटील आणि चा.पो.हे.कॉ. दिपक चौधरी यांच्या पथकाची तात्काळ स्थापना केली. या पथकाला त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.

पथकाने रावेर पोलीस ठाण्याअंतर्गंत पाल दुर्गम भागातील जंगल परिसरात सापळा रचला. सायंकाळी निळी पगडी घातलेला अंदाजे ४५ वर्षीय व्यक्ती (एमपी १० झेडसी ९६५०) या क्रमांकाच्या मोटारसायकलने येताना दिसला. त्याच्या पाठोपाठ (एमपी १० एमव्ही १४६२) क्रमांकाची मोटरसायकलवरून एक २५ वर्षीय तरुण येतांना पोलीस पथकाच्या नजरेस पडला.

पथकातील अमलदारांनी या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघांनी पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पथकातील पोलिसांनी त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांचा फिल्मी स्टाइल पाठलाग सुरु केला. यावेळी पोलिसांनी दुसऱ्या बाजूने सापळा रचून ठेवला होता. त्यांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांचे नावं गोविंदसिंग ठानसिंग बरनाला (वय-४५, रा. सिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, म.प्र.), निसानसिंग जिवनसिंग बरनाला (वय-२३, रा. उमर्टि ता. वरला, जि. बडवाणी, ह.मु. सिरवेल महादेव, ता. भगवानपुरा म.प्र.) असे आहे. पथकाने त्यांच्याकडून ०२ गावठी कट्टे, ०२ मोटरसायकली, ०२ मोबाईल हँडसेट असा एकूण अंदाजे ११,७०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, या दोघांना रावेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पो.उप. निरीक्षक तुषार पाटील हे करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment