कुरकुरीत वांगे काप; घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह ।१३ मार्च २०२३। रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर कुरकुरीत वांग्यांची भाजी तुम्ही ट्राय करू शकता. ही घरी बनवायला खूप सोप्पी आहे. ही भाजी घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
बिया नसलेले मोठे वांगे, १ कप तांदूळपिठ, १ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा जिरे- धणेपूड, कोथिंबीर. तेल आणि मीठ.

कृती
सर्वप्रथम वांगे धुवा पुसा देत काढून टाका त्याचे पातळ काप करा तिखट हळद मीठ जिरे धने पूड एकत्र करून ती कापांना लावा एका भांड्यात तांदूळ पीठ घ्या कढईत तेल कडकडीत तापवा त्यानंतर मसाला लावलेले वांग्याचे काप तांदूळ पिठात घोळवून तेलात खमंग कुरकुरीत तळून काढा. आणि सर्व्ह करा.