क्रिस्पी पोटॅटो स्नॅक रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । १ सप्टेंबर २०२३। पावसाळ्यात नेहमी काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असत. पण नेहमीच चटपटीत काय बनवावं हा प्रश्न पडतो तर अशावेळी तुम्ही क्रिस्पी पोटॅटो स्नॅक करू शकता. अगदी दहा मिनटात तयार होणारा असा हा पदार्थ आहे. हा पदार्थ बनविण्याचे साहित्य आणि कृती जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
बटाटे, कॉर्नफ्लॉवर, कांदे, काळी मिरी, चाट मसाला, मीठ, लाल मिरच्या, तेल.

कृती
सर्वप्रथम बटाटे उकडायला ठेवा त्यानंतर त्याचे साल काढून घ्या नंतर बटाटे स्मॅश करा. त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि कांदा घालावा. यानंतर या मिश्रणात मिरच्या आणि काली मिरी पूड घाला. आता या मिश्रणाला पिठाप्रमाणे गुळगुळीत करून घेऊन याचे छोटे गोळे करा. यानंतर तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाल्यावर हे गोळे तेलात तळून घ्यावे. तयार आहे क्रिस्पी पोटॅटो.