CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दलात जम्बो भरती, 10वी उत्तीर्णांना मिळेल 69,100 पगार

केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. CRPF ने कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू) च्या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 169 पदे भरायची आहेत. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी CRPF च्या अधिकृत वेबसाइट rect.crpf.gov.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 फेब्रुवारीपर्यंत आहे.

पदाचे नाव: कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू

अर्ज शुल्क
अनारक्षित प्रवर्गातील उमेदवार, इतर मागासवर्गीय आणि EWS श्रेणीतील पुरुषांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील. एससी आणि एसटी प्रवर्गातील महिला आणि उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.

वयोमर्यादा :
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 15 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे दरम्यान असावी. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील.

किती पगार मिळेल?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 21700/- ते 69,100 पर्यंत पगार मिळेल

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online