तरुण भारत लाईव्ह । ३ एप्रिल २०२३। सतत काकडीची कोशिंबीर खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर काकडी व सुक्या खोबऱ्याच्या ग्रेव्हीचा आस्वाद नक्की घेऊ शकता. हा पदार्थ घरी बनवायला सुद्धा खूप सोप्पा आहे. हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
२ मध्यम किसलेले काकडी, १ कप किसलेले नारळ, २चमचे शेंगदाणा तेल, १ चमचे जिरे, १ चमचे मोहरीच्या बिया, आवश्यकतेनुसार मीठ, ७/८ कढीपत्ता, ५/६ – हिरव्या मिरच्या, आवश्यकतेनुसार हिंग
कृती
सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक किसलेले सुके खोबरे, हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरे आणि चिमूटभर हिंग एकत्र घ्या व सर्व सामग्री वाटून जाडसर पेस्ट तयार करा. आता एका पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करत ठेवा. तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. आता दुसऱ्या बाउलमध्ये किसलेली काकडी घ्या आणि त्यात मिक्सरमध्ये वाटलेली पेस्ट मिक्स करा. आता चवीनुसार मीठ घाला व सर्व सामग्री नीट मिक्स करा. यानंतर वरून फोडणी देखील सोडा. तयार झाली आहे काकडी आणि सुक्या खोबऱ्याची ग्रेव्ही