नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडनेर-खाकुर्डी गावात कांद्याच्या पिकात अंमली गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेतात छापा टाकून सुमारे ३६ किलो ओला गांजा जप्त केला असून शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : शिक्षकाशी फेसबुकवर मैत्री; तरुणीने घरी बोलावलं अन् अंगावरील कपडे…, अखेर त्या प्रकरणाचा उलगडा
वडनेर येथील शेतकरी भरत म्हसदे ( ५५) यांनी सहा ते सात महिन्यांपूर्वी शेतातील चार ते पाच गुंठ्यात गांजाची लागवड केली होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने शेतात छापा टाकला आणि गांजाच्या झाडांचा शोध घेतला. यावेळी गांजाची झाडे उपटून ३६ किलो ओला गांजा जप्त करण्यात आला, ज्याची बाजारात किंमत सुमारे २ लाख २९ हजार रुपये आहे.
वडनेर-खाकुर्डी पोलिसांनी या प्रकरणी भरत म्हसदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे आणि नायब तहसीलदार रमेश खैरे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे.