सोलापूर : कलिंगडाच्या शेतीत गांजाची शेती करण्याचा प्रकार माढा तालुक्यात उघडकीस आला आहे. कलिंगडाच्या शेतामध्ये लावलेली १४ लाख ३२ हजार रुपयांची १२० गांजाची झाडे कुर्डुवाडी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी गांजाची लागवड करणार्या शेतकर्यास अटक केली आहे. दरम्यान अटक केलेल्या आरोपीस पोलिसांनी माढा न्यायालयात हजर केले असता आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिसांनी उजनी (मा) येथे अभिमान लोकरे (वय ५५) यांच्या कलिंगडच्या शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. यानुसार पोलिसांनी याठिकाणी छापा टाकत कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी गांजाची १२० झाडे जप्त केली आहे. याचे वजन १४१ किग्रॅ इतके आहे.