खमंग दहीवडा घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह ।३० जानेवारी २०२३। संद्याकाळच्या वेळेला भूक लागते मग अशावेळी काहीतरी वेगळं खायची इच्छा होते. पण नेमकं वेगळं काय करावं असा प्रश्न पडतो. मग चाट मध्ये भेळ, पाणीपुरी, रगडा, असे पदार्थ नेहमी खाऊन कंटाळा आला तर तुम्ही दही वडा सुद्धा घरी ट्राय करू शकता. हा घरी बनवायला सुद्धा सोप्पं आहे. दहीवडा घरी कसा बनवतात हे जाणून घ्या तरुण भारताच्या माध्यमातून.

साहित्य
मुगाची डाळ, उडीद डाळ, आले, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, जिरेपावडर, चाट मसाला, काळं मीठ, हिंग, मीठ.

कृती
वडे तळल्यानंतर आपण ते ताकात भिजवून ठेवणार आहोत, म्हणून आपण पहिल्यांदा ताकात हिंग आणि चवीपुरते मीठ घालून ढवळून घेऊ. ताक बाजूला झाकून ठेवून देऊ .एका भांड्यात दही घेऊन त्यात दीड टेबलस्पून साखर , काळे मीठ , चवीपुरते मीठ घालून नीट फेटावे. आता यात १/४ कप दूध घालून जरा पातळ करावे दही फ्रिजमध्ये थंड होण्यास ठेवावे. आता डाळींचे पाणी काढून त्यांना एकत्र मिक्सरमधून वाटून घेऊ . पाव कप पाणी वापरून डाळीची घट्ट आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्या. मिक्सरच्या दुसऱ्या भांड्यात आले, मिरची आणि कोथिंबीरीचे पाणी न घालता जाडसर वाटण करून घ्या. डाळीचे मिश्रण हाताच्या तळव्याचा वापर करून चांगले एकाच दिशेने गोलाकार फेटून घ्यावे. १० मिनिटे तरी फेटून घ्यावे. मिश्रण फेटल्यावर तयार आहे कि नाही हे पाहण्यासाठी एका पाणी भरलेल्या भांड्यात मिश्रणाचे थेंब घालावेत,

वाटलेला मसाला मिश्रणात मिसळून १० मिनिटे बाजूला झाकून ठेवावे. वडे तळण्यासाठी वडे बुडतील इतके तेल कढईत घालून मध्यम आचेवर गरम होऊ द्यावे. . तेल गरम झाले की आच मंद करून हाताला पाणी लावून गोल गोल छोटे वडे तेलात अलगद सोडावेत. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस सोनेरी रंगावर वडे तळावेत. एका भांड्यात हलके गरम पाणी घेऊन त्यात हे तळलेले वडे ३-४ मिनिटांसाठी बुडवून ठेवावेत जेणेकरून ते पाणी शोषून आतपर्यंत मऊ होतील. ३-४ मिनिटांनंतर वडे दोन्ही हातांच्या तळव्यांत अलगद दाबून त्यातले पाणी काढून टाकावे . वडे तुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मग हे वडे वाढेपर्यंत ताकात भिजवून ठेवावेत. अशा प्रकारे सारे वडे तळून क्रमाने पाण्यात आणि नंतर ताकात भिजवून ठेवावेत. दही वडे सर्व करताना , प्रथम टाकत बुडवलेला वडा सर्विंग डिश मध्ये घेऊन त्यावर थंड दही घालावे , मग आवडीप्रमाणे लालमिर्ची पूड, जिरे पावडर आणि चाट मसाला घालावा.