तरुण भारत लाईव्ह । ३१ ऑगस्ट २०२३। वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुला शुभ ग्रह म्हटले जाते. गुरु ग्रह हा ४ सप्टेंबर पासून ते ३१ डिसेंबर पर्यंत मेष राशीत वक्री असेल. या काळात बृहस्पती काही राशींसाठी त्रासदायक ठरेल. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
या काळात मेष राशींच्या लोकांना संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. या काळात बरेच अनावश्यक खर्च होतील. आरोग्य बिघडू शकते. आर्थिक चणचण जाणवेल. ऑफिस मध्ये कामाचा ताण राहील.
वृषभ रास
या काळात नशिबाची तुम्हाला साथ मिळणार नाही. कुटुंबाचा विरोध पत्करावा लागू शकतो. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. सहकाऱ्यांसोबत वाद निर्माण होतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कर्क रास
या काळात तुम्हाला शत्रूपासून सावध रहावे लागेल. या काळात तुम्हाला व्यवसायात नुकसान होऊ शकते. या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. अन्यथा काही आजारांना सामोरे जावे लागू शकते.